शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paytm ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ट्रान्झिट कार्ड लाँच, जाणून घ्या कसं अन् कुठं वापरता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 5:10 PM

1 / 8
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएमने (Paytm)अलीकडेच प्रीपेड रुपे कार्ड (RuPay Card) पेटीएम वॉलेट ट्रान्झिट कार्ड (Paytm Wallet Transit Card) लाँच केले आहे. हे कार्ड सर्व मर्चेंट आउटलेट्स किंवा ऑनलाइन वेबसाइटवर वापरले जाऊ शकते, जे रुपे कार्ड स्वीकारतात.
2 / 8
हे रुपे कार्ड एक प्रीपेड कार्ड आहे, जे तुमच्या पेटीएम वॉलेट बॅलन्सशी लिंक केले असेल. म्हणजचे, या कार्डद्वारे तुम्ही वॉलेट बॅलन्स देखील वापरू शकता. या कार्डद्वारे युजर्स मेट्रो, रेल्वे, सरकारी बस, टोल आणि पार्किंगमध्ये पेमेंट करू शकतात.
3 / 8
दरम्यान, याआधीच किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी आणि विजेचे बिल भरण्यासाठी, गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही पेटीएम वॉलेटचा (Paytm Wallet) वापर करता.
4 / 8
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या (Paytm Payments Bank Ltd.) माहितीनुसार, हे कार्ड केवळ ऑनलाइन शॉपिंग आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी (ATM Withdrawal)देखील वापरले जाऊ शकते. ट्रान्झिट कार्डद्वारे युजर्स बँकिंग आणि व्यवहारांशी संबंधित सर्व कामे सहज करू शकतील.
5 / 8
या कार्डमध्ये पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. या कार्डची होम डिलिव्हरी युजर्सना केली जाईल. प्रीपेड कार्ड थेट वॉलेटशी जोडलेले आहे. हैदराबाद मेट्रो रेल्वेच्या (Hyderabad Metro Rail) सहकार्याने पेटीएम ट्रान्झिट कार्ड आणले गेले आहे.
6 / 8
दिल्ली एअरपोर्ट एक्सप्रेस लाइन आणि अहमदाबाद मेट्रोमध्ये पेटीएम ट्रान्झिट कार्ड सुरू झाले आहे. मेट्रो शहरांमध्ये तसेच देशभरातील इतर महानगरांमध्ये युजर्स पेटीएम ट्रान्झिट कार्ड एकाच कार्डद्वारे वापरू शकतात. पेटीएम पेमेंट्स बँकेचे एमडी आणि सीईओ सतीश गुप्ता म्हणाले की, पेटीएम ट्रान्झिट कार्ड सुरू केल्यामुळे लाखो भारतीय एकाच कार्डद्वारे सर्व गोष्टी करू शकतील. या कार्डमध्ये बँकिंग गरजा आणि ट्रान्सपोर्टची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
7 / 8
एक्सपायरी डेट आणि सीव्हीव्ही नंबर असलेले हे 16 अंकी कार्ड आहे. या कार्डद्वारे, तुम्ही तुमचे पेटीएम वॉलेट बॅलन्सला ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रत्येक ठिकाणी वापरू शकता. म्हणजेच, जर तुमची पेटीएम वॉलेट बॅलन्स 500 रुपये असेल आणि तुम्ही अशा दुकानातून वस्तू खरेदी करत असाल जिथे स्वाइप मशीन(POS) असेल पण पेटीएम वॉलेटचा ऑप्शन नसेल. अशा परिस्थितीत, तुम्ही फिजिकल पेटीएम वॉलेट कार्डच्या मदतीने स्वाइप मशीनद्वारे 500 रुपयांचे पेमेंट करू शकाल.
8 / 8
तुम्ही सर्वात आधी पेटीएम अॅप ओपन करा. होम पेजवर, My Paytm सेक्शनमध्ये जाऊन Paytm Wallet वर क्लिक करा. तेथे तुम्हाला तळाशी पेटीएम वॉलेट कार्ड अॅक्टिव्हेट करण्याचा ऑप्शन मिळेल. दरम्यान, सध्या निवडक युजर्संना हे कार्ड दिले जात आहे.
टॅग्स :businessव्यवसायPaytmपे-टीएम