शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या ₹3 च्या शेअरनं फक्त 6 महिन्यांत बदलवलं गुंतवणूकदारांचं नशीब! आता खरेदीसाठी तुटून पडले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 5:41 PM

1 / 8
स्टॉक मार्केटमध्ये अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत मालामाल केले आहे. असाच एक पेनी स्टॉक राठी स्टील अँड पॉवरचा आहे. हा पेनी स्टॉक गेल्या सहा महिन्यांत मल्टीबॅगर स्टॉक म्हणून समोर आला आहे.
2 / 8
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी अर्थात शुक्रवारी, या स्टॉकला 2 टक्क्यांते अप्पर सर्किट लागले. आता या स्टकची किंमत 41.07 रुपयांवर पोहोचली आहे. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
3 / 8
सातत्याने लागतेय अप्पर सर्किट - गेल्या एका आठवड्यात राठी स्टील अँड पॉवर या स्मॉल कॅप स्टॉकला सतत्याने अप्पर सर्किट लागत आहे. गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक ₹30.12 वरून ₹41.07 प्रति शेअरने वधारला आहे.
4 / 8
यामुळे त्याच्या गुंतवणूकदारांना सुमारे 35 टक्के एवढा बंपर परतावा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत, हा स्टॉक ₹ 3.30 वरून ₹ 41.07 वर पोहोचला आहे. हा अंदाजे 1150 टक्के एवढा सकारात्मक परतावा दर्शवते.
5 / 8
₹1 लाखाचे झाले ₹12.50 लाख - राठी स्टील अँड पॉवरच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका आठवड्यापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक आतापर्यंत कायम ठेवली असती तर त्याचे मुल्य आता ₹1.08 लाख झाले असते.
6 / 8
याच पद्धतीने एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये एका महिन्यापूर्वी ₹1 लाख गुंतवले असते आणि आतापर्यंत कायम ठेवले असेत, तर आता त्याचे मूल्य ₹1.35 लाख झाले असते. तसेच, एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या ₹3.30 च्या शेअरमध्ये ₹1 लाखची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता तीचे मूल्य ₹12.50 लाख झाले असते.
7 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसाStock Marketशेअर बाजार