शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार पेन्शन; जाणून घ्या पंतप्रधान वय वंदना योजनेशी निगडीत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 6:14 PM

1 / 5
आपण वर्षानुवर्षे काम करतो. परंतु आपल्या निवृत्तीनंतर काय असा प्रश्न आपल्याला कायमच भेडसावत असतो. हीच बाब ध्यानात घेत केंद्र सरकारनं पंतप्रधान वय वंदन योजनेची सुरूवात केली. यामध्ये जर तुम्ही योग्यवेळी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली तर तुम्हाला चांगली रक्कम पेन्शनच्या रूपात मिळू शकते.
2 / 5
या योजनेत सर्वाधिक १५ लाख रूपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. जर पती पत्नी या दोघांचंही वय ६० वर्षांपेक्षा अधिक असेल तर अशा परिस्थितीत दोघेही या स्कीमचा फायदा घेऊ शकतात.
3 / 5
या स्कीममध्ये जास्तीतजास्त १० वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तसंच ३ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर यासोबत कर्ज घेण्याची सुविधाही देण्यात येते. यामध्ये मासिक पैसे गुंतवल्यास ७.४०, तिमाही ७.४५, सहामाही ७.५२ आणि वार्षिक पैसे गुंतवल्यास ७.६० टक्क्यांचं व्याज देण्यात येतं.
4 / 5
या स्कीमसाठी तुम्हाला LIC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल किंवा आपण एजंटच्या माध्यमातून याचा लाभ देखील घेऊ शकता. जर तुम्ही हा विमा ऑफलाइन खरेदी केला, तर तुम्हाला ते परत करण्यासाठी १५दिवसांचा कालावधी असेल. तर, ऑनलाइन खरेदी करताना हाच कालावधी १ महिना असेल.
5 / 5
जर एखाद्या व्यक्तीने १,६२,१६२ रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला १० वर्षांसाठी दरमहा १ हजार रुपये मिळतील. त्याचप्रमाणे, जर कोणी १५ लाख रुपये गुंतवले, तर त्याला ९,२५० रुपये मिळतील. परंतु जर तुम्ही पेमेंट ऑप्शन लिक केलं तर पुन्हा ते बदलण्याचा पर्याय उपलब्ध नसेल.
टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनLIC - Life Insurance CorporationएलआयसीMONEYपैसाInvestmentगुंतवणूक