People flock to buy this share, the price is less than Rs 500; Company can pay rs 120 dividend!
या शेअरच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड, ₹500 पेक्षाही कमी आहे किंमत; कंपनी देऊ शकते ₹120 डिव्हिडेंड! By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 1:50 PM1 / 8शेअर बाजारातील अॅस्टर डीएम हेल्थकेअर (Aster DM Healthcare) कडून आपल्या गुंतवणूकदारांना 70 ते 80 टक्क्यांपर्यंत डिविडेंड दिला जाऊ शकतो. यासंदर्भात कंपनीने शेअर बाजाराला माहिती दिली आहे. गेल्या 5 वर्षांत कंपनीकडून डिव्हिडेंड देण्यात आलेला नाही.2 / 8डिव्हिडेंड मिळण्याची शक्यता वाटताच, आज कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. सकाळी 9.18 वाजण्याच्या सुमारास, हा शेअर 449.75 रुपयांवर ट्रेड करत होता. हा कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांक आहे.3 / 8लवकरच पूर्ण होऊ शकते डील - कंपनीने सोमवारी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, अॅस्टर डीएम हेल्थकेअर एफझेडसीमध्ये आपला वाटा अल्फा जीसीसीला विकण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात सामाधानकारक चर्चा झाली असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. लवकरात लवकर ट्रांझॅक्शन पूर्ण करण्याची या दोन्ही कंपन्याची इच्छा आहे.4 / 8ही संपूर्ण डील 1.01 बिलियन डॉलरमध्ये होऊ शकते, असे कंपनीने 28 नोव्होंबर 2023 रोजी म्हटले होते. यांपैकी 903 मिलियन डॉलर ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यावर मिळू शकतात. तसेच उरलेले 98.8 मिलियन डॉलर नंतर दिले जाणार आहेत. 5 / 8कंपनीने म्हटले आहे की, 903 मिलियन डॉलरचे 70 ते 80 टक्के 110 रुपयांपासून ते 120 रुपये प्रति शेअर असेल. हे ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर कंपनी डिव्हिडेडची घोषणा करू शकते. 6 / 81 वर्षात पैसा डबल! - कंपनीच्या शेअरची किंमत मंगळवारी 12 टक्क्यांहून अधिकने वाढली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात अॅस्टर डीएमचा शेअर बीएसईवर 440 रुपयांवर ट्रेड करत होता. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 97 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.7 / 8अॅस्टर डीएमची स्थापना 1987 मध्ये दुबईत झाली. ही कंपनी सध्या 33 रुग्णालये, 127 क्लिनिक्स, 527 फार्मेसी आणि 229 लॅब्स चालवते.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications