शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, महागाईने भरडलेल्या नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 6:50 AM

1 / 9
मार्चपासून कच्च्या तेलाचे दर २० टक्क्यांनी घसरून १०० डॉलरवर आले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव तर कमी होतीलच, पण त्याबरोबरच विमान प्रवास, पेंट, कपडे आणि सिमेंट अशा प्रमुख ६ क्षेत्रांना फायदा होऊन या वस्तू स्वस्त होतील. यामुळे महागाईने भरडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2 / 9
ग्राहकोपयोगी प्रत्येक वस्तूंची किंमत वाढत असताना एका एका वस्तूच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी सटीक उपाययोजना सुरू ठेवण्याची गरज आहे. सरकार आणि आरबीआयला आता अतिशय सावध राहावे लागेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
3 / 9
हवाई वाहतूक : हवाई वाहतूक कंपन्यांचा सर्वाधिक ४० टक्के खर्च इंधनावर (एटीएफ) होतो. २०२२ मध्ये एटीएफ ७१ टक्क्यांनी वाढून १.२३ लाख रुपये प्रतिकिलो लीटर झाले. कच्चे तेल उतरल्यामुळे एटीएफ स्वस्त होईल.
4 / 9
पेट्रोकेमिकल्स : मॅकेंजी अहवालानुसार, कच्च्या तेलातील घसरगुंडीमुळे मागील ३ महिन्यांत या क्षेत्राचा खर्च २० टक्क्यांनी घसरला आहे.
5 / 9
पेंट उद्योग : पेंट उद्योगात वापरल्या जाणाऱ्या ३०० पेक्षा जास्त कच्च्या मालात पेट्रोलियम उत्पादनांचा सर्वाधिक समावेश आहे. कच्चे तेल स्वस्त झाल्याचा फायदा या उद्योगास होईल.
6 / 9
टेक्सटाइल : सिंथेटिक टेक्सटाइल उद्योगात वापरले जाणारी फायबर, यार्न आणि फॅब्रिक ही सर्व उत्पादने पेट्रोलियम उद्योगाची उप-उत्पादने (बाय-प्रॉडक्ट) आहेत. त्यांच्या किमती आता कमी होतील.
7 / 9
टायर उद्योग : टायरचे ६० टक्के उत्पादन कच्च्या तेलाशी संबंधित आहे. कच्चे तेल उतरल्यामुळे टायरच्या किमती कमी होतील. मागणी वाढून उद्योगास मोठा लाभ होईल.
8 / 9
सिमेंट : सिमेंट उद्योगातील ६० टक्के व्यवसाय कच्च्या तेलाच्या किमतीशी संबंधित आहे. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे सिमेंट उद्योगास थेट फायदा होईल.
9 / 9
महागाई उतरणीला - भाजीपाला आणि डाळींच्या किमती कमी झाल्याने जूनमध्ये किरकोळ महागाईत घट होऊन ७.१ टक्क्यांवर आली आहे. मात्र तरीही अन्नधान्य, फळे मात्र महाग झाली आहेत.
टॅग्स :businessव्यवसायPetrolपेट्रोलDieselडिझेलnirmala sitharamanनिर्मला सीतारामन