1 / 8देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती ३०० रुपयांचे दर पार करतील? तुमचाा विश्वास बसत नाहीय ना... पेट्रोल, डिझेल जर एवढे महाग झाले तर विचार करा अन्न धान्याचे, भाजपाल्याचे, वस्तूंचे दर कुठे जाऊन पोहोचतील? सध्या महाराष्ट्रात पेट्रोल ११२ रुपये आणि डिझेल ९६ रुपये प्रति लीटर आहे. पण हेच दर वाढत वाढत जाऊन ३०० रुपयांवर जाण्य़ाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 2 / 8कच्च्या तेलाच्या किंमतींवर देशात इंधनाचे दर ठरतात. सध्या इंधन कंपन्या तोट्यात आहेत. परंतू, एका बड्या संस्थेच्या अंदाजानुसार याच कच्च्या तेलाच्या किंमती 380 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या रिपोर्टनंतर संपूर्ण जग हादरले आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर हे १११ डॉलर प्रति बॅरल एवढे आहेत. 3 / 8जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीच्या तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. जर अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर आणखी कठोर झाले तर रशिया जगाला जोखडात बांधण्यासाठी कच्च्या तेलाचे उत्पादन पाच दशलक्ष बॅरल एवढे कमी करू शकतो. 4 / 8यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाची टंचाई निर्माण होईल आणि क्रूड ऑईल 380 डॉलर प्रति डॉलर वर जाण्याची शक्यता आहे. युक्रेनवर हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपने रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत.5 / 8जेपी मॉर्गनच्या एक्सपर्टनी सांगितले की, जर रशियाने दर दिवशी तीन दशलक्ष बॅरलची कपात केली तर लंडन बेंचमार्कवर कच्च्या तेलाची किंमत १९० डॉलरवर जाईल. तर हीच कपात पाच दशलक्ष डॉलर केली तर कच्च्या तेलाच्या किंमती या 380 डॉलर प्रति बॅरलवर येईल. 6 / 8कच्च्या तेलाचे दर जर ३८० वर गेल्यास भारतात पेट्रोल 385 रुपये प्रति लीटरवर जाईल. कारण सध्या १११ डॉलर प्रति बॅरलवर दर असताना १११ रुपये प्रति लीटर पेट्रोल आहे. यानुसार हा अंदाज काढण्यात आला आहे. म्हणजेच आजच्यापेक्षा इंधनाच्या किंमती साडे तीन पटींनी वाढणार आहेत. 7 / 8अनेक तज्ज्ञांनी जेपी मॉर्गनच्या रिपोर्टला निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी तशी परिस्थिती उद्भवेल असे दिसत नाही. 8 / 8एप्रिलनंतर भारताने रशियाकडून ५० पटींनी अधिक कच्चे तेल खरेदी केले. यामुळे भारत आता रशियाकडून वापराच्या १० टक्के कच्चे तेल आयात करतो. युक्रेनपूर्वी भारत रशियाकडून एकूण मागणीच्या ०.२ टक्के तेल खरेदी करत होता. एप्रिलमध्ये ही वाढून १० टक्क्यांवर पोहोचले.