petrol pump free facilities you can avail these facilities for free in a petrol pump
'या' सुविधा तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत वापरू शकता, वाचा सविस्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:50 AM1 / 6देशात दररोज करोडो वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. या वाहनांमध्ये डिझेल, पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. यातील बहुतांश वाहने डिझेल आणि पेट्रोल इंजिनवर आधारित आहेत. त्यामुळे भारतात डिझेल पेट्रोलचा जास्त वापर केला जातो. 2 / 6डिझेल आणि पेट्रोल संपल्यानंतर लोक वाहनांमध्ये पेट्रोल पंपावर डिझेल भरतात. ग्राहक जितके पेट्रोल आणि डिझेल वाहनात भरतात. त्यानुसार, त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. मात्र, पेट्रोल पंपावर तुम्हाला फक्त डिझेल-पेट्रोलची सुविधा मिळत नाही. तर तुम्हाला पेट्रोल पंपावर इतरही अनेक सुविधा मोफत मिळतात. 3 / 6या सुविधा वापरण्यासाठी पेट्रोल पंप व्यवस्थापन तुमच्याकडून एक पैसाही आकारत नाही. अनेकांना या सुविधांची माहिती नसते. ज्यामुळे ते अशा सुविधांचा वापर करताना दिसून येत नाहीत किंवा करत नाहीत. तर पेट्रोल पंपावर कोण-कोणत्या सुविधा मिळतात, त्याबद्दल जाणून घ्या... 4 / 6जर तुमच्या गाडीच्या टायरमधील हवा कमी झाली. तर तुम्ही सहसा कार मेकॅनिकच्या दुकानात जाता आणि त्यामध्ये हवा भरता. त्यामुळे यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात. पण, जर तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले आणि तुम्ही पेट्रोल पंपावरच टायरमध्ये हवा भरली. तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. कारण, ही सुविधा पेट्रोल पंपाकडून मोफत दिली जाते. जर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने यासाठी तुमच्याकडे पैशांची मागणी केली. तर, तुम्ही त्याच्याबद्दल तक्रार करू शकता.5 / 6जर तुम्ही प्रवास करून आला असाल आणि तुमच्याकडे पाण्याची बाटली नसेल. मग तुम्ही पेट्रोल पंपावर पाणी पिऊ शकता, यासाठी पेट्रोल पंप मालक तुम्हाला थांबवू शकत नाही. याशिवाय, तुम्ही पेट्रोल पंपाच्या सार्वजनिक सुविधांचाही वापर करू शकता. तुम्ही पेट्रोल पंपावर असलेले सुलभ शौचालये देखील वापरू शकता.6 / 6तुम्ही कुठेतरी प्रवास करत असाल, पण तुमच्या फोनची बॅटरी संपलेली आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाचा कॉल करावा लागणार आहे, अशावेळी तुम्ही पेट्रोल पंपावर लावलेल्या लँडलाइन फोनवरून मोफत कॉल करू शकता. पेट्रोल पंप मालकही तुम्हाला हे करण्यापासून रोखू शकत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications