शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PF खातेदारांना बसणार 'जोर का झटका'! असं आहे कारण

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 17, 2021 3:36 PM

1 / 10
यावर्षी कोट्यवधी पीएफ खातेदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) या आर्थिक वर्षासाठी व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.
2 / 10
ईपीएफओचे केंद्रीय ट्रस्टी बोर्ड आर्थिक वर्ष 2020-21साठी व्याज दर निश्चित करण्यासाठी 4 मार्चला बैठक करणार आहे.
3 / 10
तज्ज्ञांच्या मते यावर्षी व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा व्याजदर सात वर्षांतील सर्वात कमी म्हणजे 8.5 टक्क्यांवर होता.
4 / 10
श्रीनगर येथे होणाऱ्या या बैठकीसाठी अद्याप कसल्याही प्रकारचा अधिकृत अजेंडा निश्चित करण्यात आलेला नाही. मात्र, इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका वृत्तानुसार, या बैठकीत व्याजदरावर विचार होऊ शकतो.
5 / 10
कोरोना काळात अनेकांनी पीएफमधून पैसे काढले - कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी मोठ्या प्रमाणावर पीएफमधून पैसे काढले आहेत. तसेच या आर्थिक वर्षात रोजगार घटल्याने पीएफमधील योगदानही कमी झाले आहे. यामुळे पीएफमधील एकूण जमा असलेल्या पैशांत कमी आली, परिणामी यातून मिळणारा नफाही कमी झाला असेलच.
6 / 10
कोट्यवधी रुपये काढले गेले - ईपीएफओच्या मते, 31 डिसेंबर 2020 पर्यंत 56.79 लाख क्लेमच्या माध्यमाने जवळपास 14,310.21 कोटी रुपये पीएफमधून काढले गेले आहेत.
7 / 10
एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत 73,288 कोटी रुपयांचे 197.91 लाख फायनल सेटलमेंट करण्यात आले आहेत. यात अॅडव्हॉन्स, विमा आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर देण्यात येणाऱ्या पैशांचाही समावेश आहे.
8 / 10
याच पद्धतीने त्या कंपन्यांच्या ट्रस्टने 3,983 कोटी रुपयांचे 4.19 लाख सेटलमेंट केले आहेत.ज्या सूटअंतर्गत आपला पीएफ ट्रस्ट चलवितात.
9 / 10
गेल्यावर्षी मार्चमहिन्यात ईपीएफ सब्सक्रायबर्सना आर्थिक वर्ष 2019-20 साठी 8.5 टक्के व्याज देण्यात यावे, अशी शिफारस ईपीएफओच्या केंद्रीय ट्रस्टी बोर्डाने केली होती.
10 / 10
गेल्यावर्षी मार्चमहिन्यात ईपीएफ सब्सक्रायबर्सना आर्थिक वर्ष 2019-20 साठी 8.5 टक्के व्याज देण्यात यावे, अशी शिफारस ईपीएफओच्या केंद्रीय ट्रस्टी बोर्डाने केली होती.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारीcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार