शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्या मुलांना दिवाळीत फटाके फोडायला आवडतात? मग ९ रुपयांचा इन्शुरन्श कुटुंब ठेवेल सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 2:03 PM

1 / 6
फटाक्यांशिवाय दिवाळी सणाची कल्पनाच कुणी करू शकत नाही. अलीकडच्या काळात अनेकजण फटाक्यांशिवाय देखील सण साजरा करतात. मात्र, पूर्वीपासून या सणाला मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात.
2 / 6
सध्या देशभरात दिवाळीची मोठ्या थाटामाटात जय्यत तयारी सुरू आहे. दिवाळीच्या सणात फटाक्यांमुळे अनेक घटना घडतात. तुम्हाला अशा घटना टाळायच्या असतील, तर PhonePe चा ९ रुपयांचा विमा (Phonepe Firecracker Insurance) तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
3 / 6
Phonepe च्या या विम्यामध्ये २५ हजार रुपयांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. हा विमा अल्प मुदतीसाठी लागू करण्यात आला आहे. ज्याद्वारे युजर्सना अल्पावधीत स्वस्त किंमतीत सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते.
4 / 6
फोनपे ॲपद्वारे कोणीही हा विमा खरेदी करू शकतो. या योजनेत ग्राहक, जोडीदार आणि त्यांच्या २ मुलांसह कुटुंबातील ४ सदस्यांचा समावेश आहे. एक विमा पॉलिसी घेऊन कुटुंबातील ४ सदस्यांना सुरक्षित करता येते.
5 / 6
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढते. या अपघातांसाठी कंपनीने अल्पकालीन विमा योजना आणली आहे. ही योजना बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने सादर करण्यात आली असल्याची माहिती फोन पे ने दिली.
6 / 6
यामध्ये ग्राहकांना केवळ ९ रुपयांमध्ये १० दिवसांच्या कालावधीसाठी विम्याची सुविधा दिली जाणार आहे. ज्यामध्ये फटाक्यांमुळे अपघाताला बळी पडलेल्या व्यक्तीला २५,००० रुपयांपर्यंतच्या कव्हरेजचा लाभ मिळतो.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Familyपरिवार