शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुंतवणूकदारांची चांदी! 11 रुपयांवरून थेट ​​2525 रुपयांवर पोहोचला हा शेअर, 1 लाखाचे झाले 2.2 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 9:28 PM

1 / 7
एकादा गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या माध्यमाने करोडपतीही होऊ शकतो. त्यात केवळ संयम असायला हवा. आज आम्ही ज्या शेअरसंदर्भात आपल्याला माहिती देत आहोत, त्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात करोडपती परतावा दिला आहे.
2 / 7
याठिकाणी आपण ज्या कंपनीच्या शेअरसंदर्भात बोलत आहोत, त्या कंपनीचे नाव आहे, पिडिलाइट इंडस्ट्रीज (Pidilite Industries). ही कंपनी फेविकॉल आणि फेविक्विक सारखे प्रोडक्ट तयार करते.
3 / 7
Pidilite Industries चे शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. कंपनीच्या शेयरने गेल्या 20 वर्षांत 22112.47% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. या काळात हा शेअर 11.39 रुपयांवरून मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेन्जवर 2,530 वर पोहोचला.
4 / 7
1 लाखाचे झाले 2 कोटींहून अधिक - जर एखाद्या गुंतवणूकदाराने वीस वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 2.22 कोटी रुपये झाले असते. पिडीलाइट इंडस्ट्रीज ही भारतातील अॅडेसिव्ह, सीलंट, कन्स्ट्रक्शन केमिकल्सची आघाडीची कंपनी आहे.
5 / 7
या कंपनीच्या काही प्रमुख ब्रँडमध्ये Fevicol, Dr. Fixit, Fevi-Quick, M-Seal, Roff आणि Chemifix यांचा समावेश होतो. यांपैकी फेव्हिकॉल हा लाखो लोकांसाठी अॅडेसिव्हचा एक पर्याय बनला आहे आणि भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये त्याचा क्रमांक लागतो.
6 / 7
प्रमोटर्सचा वाटा 69.94 ट्क्के - पिडीलाइट इंडस्ट्रीजमध्ये प्रवर्तकांची होल्डिंग 69.94 टक्के आहे. याशिवाय कंपनीचे 11.34 टक्के शेअर्स परदेशांतील संस्थागत गुंतवणूकदारांकडे (FIIs) आहेत, 11.25 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांकडे, 3.34 टक्के देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे, तर 4.04 टक्के म्युच्युअल फंड्सकडे आहेत. ही एक लार्ज-कॅप कंपनी असून हिचे मार्केट कॅप 1,28,561.65 कोटी रुपये एवडे आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक