शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Drone Flying Rules : ड्रोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग, 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:46 PM

1 / 8
सध्याच्या घडीला ड्रोनचा वापर खूप वाढत आहे, पण त्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. ड्रोनचे नियम नौदल, लष्कर आणि हवाई दल वगळता सर्वांना लागू होतात.
2 / 8
ड्रोन उडवण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक असून, परवान्याशिवाय कोणी ड्रोन उडवल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. बेकायदेशीरपणे ड्रोनचा वापर करताना एखादी व्यक्ती पकडली गेली तर त्याला तुरुंगवासही होऊ शकतो.
3 / 8
टेक्नॉलॉजी झपाट्याने विकसित होत आहे. पूर्वीचे महागडे ड्रोन आता परवडणारे झाले आहेत. त्यामुळे सामान्य लोकही सध्या ड्रोन खरेदी करू शकतात. आता ड्रोन ५ ते १० हजार रुपयांना मिळतात.
4 / 8
दरम्यान, ड्रोनचे उड्डाण करण्यासाठी काही नियम आणि कायदे करण्यात आले आहेत, ज्यांचे पालन प्रत्येकाने करणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला ड्रोन उडवायचे असेल, तर तुम्हाला नागरी उड्डयन मंत्रालय (MOCA) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांनी जारी केलेल्या ड्रोन नियम २०२१ ची माहिती असणे आवश्यक आहे.
5 / 8
हे नियम नौदल, लष्कर आणि हवाई दल वगळता सर्वांना लागू आहेत. या नियमानुसार कोणतेही ड्रोन खरेदी केल्यानंतर त्याची डिजिटल नोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्ही ड्रोन कुठे उडवणार आहात हेही सांगावे लागेल.
6 / 8
ड्रोनचा आकार कितीही लहान असला तरी त्याला परवानगीशिवाय उडवण्याची परवानगी नाही. परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास विमान अधिनियमन १९३४ च्या तरतुदीनुसार कारवाई होऊ शकते. तसेच एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
7 / 8
ड्रोनचे लहान, मध्यम आणि मोठे अशा तीन कॅटगरीत विभाजन करण्यात आले आहेत. लहान ड्रोनचे वजन २ ते २५ किलो, मध्यम ड्रोनचे वजन २५ ते १५० किलो आणि मोठ्या ड्रोनचे वजन १५० ते ५०० किलोपर्यंत असू शकते.
8 / 8
यापेक्षा मोठे ड्रोन यूएव्ही विमान नियम १९३७ अंतर्गत येतात. ड्रोन उडवण्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र मिळवावे लागेल आणि डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवरून UIN क्रमांक तयार करावा लागेल.
टॅग्स :businessव्यवसायJara hatkeजरा हटके