शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अचानक पडली पैशांची गरज तर टेन्शन घेऊ नका; इथं मिळू शकतील 10,000 रुपये, जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 9:17 AM

1 / 9
नवी दिल्ली : आम्ही जन धन खात्याबद्दल (Jandhan Account) बोलत आहोत. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सरकारी बँकांमध्ये खाती उघडली अधिक जातात. परंतु, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेतही उघडू शकता.
2 / 9
जन धन योजना खात्यात खातेदाराला अनेक सुविधा मिळतात. केंद्र सरकार प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY- Jan Dhan Yojna) अंतर्गत शून्य शिल्लक बचत खाते (झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट) उघडते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुक यासह इतर अनेक लाभही मिळतात.
3 / 9
जन धन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळू शकते. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने आता ही सुविधा 10,000 पर्यंत वाढवली आहे.
4 / 9
जर तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्यासंबंधीच्या सर्व नियमांची माहिती असायला हवी. या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे.
5 / 9
ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान सहा महिने जुने असले पाहिजे. जर तुम्हाला खाते उघडून सहा महिने झाले नसतील तर केवळ 2 हजार रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळू शकते.
6 / 9
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हा बँकिंग/बचत आणि ठेव खाती, विप्रेषण, कर्ज, विमा, निवृत्तीवेतन यामध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे.
7 / 9
प्रधानमंत्री जन धन योजनेच्या वेबसाइटनुसार, 5 एप्रिल 2023 पर्यंत या योजनेत एकूण 48.70 कोटी लोकांनी खाती उघडली आहेत आणि 32.96 कोटी रूपे डेबिट कार्ड जारी केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ग्रामीण आणि निमशहरी भागात 32.48 कोटी खाती उघडण्यात आली आहेत.
8 / 9
प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये खाती अधिक उघडली जातात. परंतु, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेतही उघडू शकता.
9 / 9
तुमचे दुसरे बचत खाते असल्यास, तुम्ही ते जन धन खात्यात रूपांतरित करू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, तो जन धन खाते उघडू शकतो.
टॅग्स :bankबँकMONEYपैसाbusinessव्यवसाय