शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM-KISAN: 42 लाख अपात्र शेतकऱ्यांनी घेतले 3000 कोटी रुपये; आता सरकार करणार वसूली...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 5:40 PM

1 / 10
केंद्र सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेत गोंधळ होत आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मते 42 लाखहून अधिक अपात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2900 कोटी रुपयांपेक्षाही अधिक पैसे ट्रान्सफर केले गेले आहे. (PM-KISAN: 42 lakh ineligible farmers took Rs 3,000 crore, Now the Modi government will recover)
2 / 10
हे पैसे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहेत, जे शेतकरी PM-KISAN योजनेच्या अटी पूर्ण करत नाहीत.
3 / 10
सरकार करणार वसूली - यासंदर्भात, आता 42.16 लाख अपात्र शेतकऱ्यांकडून एकूण 2992.75 कोटी रुपयांची रिकव्हरी करायची आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सांगितले.
4 / 10
या अपात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या आसाम, तामिळनाडू, छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमध्ये आहे.
5 / 10
नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितल्यानुसार, आसाममधील एकूण 8.35 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 554.01 कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत.
6 / 10
याशिवाय, पंजाबमध्ये जवळपास 438 कोटी, महाराष्ट्रात जवळपास 358 कोटी, तामिळनाडूतील अपात्र शेतकऱ्यांकडून 340.56 कोटी आणि उत्तर प्रदेशातील अपात्र शेतकऱ्यांकडून 258.64 कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.
7 / 10
योजनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, पीएम-किसानसाठी लाभार्थ्यांची ओळख पटविण्याची जबाबदारी राज्यांची आहे.
8 / 10
आयकर रिटर्न फाइल करणाऱ्या अथवा सरकारी नौकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे.
9 / 10
दर वर्षी मिळतात 6 हजार रुपये - पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत सरकार वर्षाला 6 हजार रुपये देते. ही रक्कम चार महिन्यातून एकदा मिळते. ही योजना 2019मध्ये सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत आठ हप्ते आले आहेत.
10 / 10
गेल्या मे महिन्यात या योजनेअंतर्गत 9 कोटी 50 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. याअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा करण्यात आले.
टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरParliamentसंसदPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना