शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM Kisan: 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशांत मोठी वाढ होणार; जाणून घ्या, 6000 ऐवजी किती रुपये मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 5:18 PM

1 / 7
देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होत आहे. या अर्थसंकल्पाकडून नौकरी करणारे लोक आणि शेतकरी, या दोघांनाही मोठी आशा आहे. यावेळी नैकरी करणाऱ्या लोकांना आयकराच्या बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
2 / 7
याशिवाय, शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी येत आहे. यामुळे अर्थमंत्री न‍िर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याकडून करण्यात येणाऱ्या घोषणांकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे. याच बरोबर, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीरही सरकारकडून लोकांना आकर्षित करणारी बरीच आश्वासनेही दिली जाऊ शकतात.
3 / 7
शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देऊ शकते सरकार - सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, यावेळी सरकार शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देऊ शकते. यावेळी, अर्थमंत्री न‍िर्मला सीतारमण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीएम क‍िसान न‍िध‍ीच्या (PM Kisan Nidhi) पैशांत वाढ करण्याची घोषणा करू शकतात.
4 / 7
सूत्रांचे म्हणणे आहे, की पीएम किसान सन्मान निधीत (PM Kisan Samman Nidhi Yojana) दर वर्षी मिळणाऱ्या 6 हजार रुपयांच्या रकमेत वाढ केली जाऊ शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सरकार हा निर्णय घेऊ शकते.
5 / 7
3 एवजी 4 वेळा मिळणार पैसे - असे बोलले जात आहे, की या योजनेत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिलेली जाणारी रक्कम आता 4 हप्त्यांमध्ये दिली जाऊ शकते. यानुसार आता दर तिमाहीला शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
6 / 7
सध्या दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग केले जातात. मात्र, हा बदल झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात दर तिमाहीला 2000 रुपये जमा केले जातील. अर्थात, शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपयांऐवजी 8000 रुपये जमा होतील.
7 / 7
पीएम क‍िसान सन्मान न‍िध‍ीचा 13वा हप्ता जानेवारी 2023 मध्ये येण्याची शक्यता. यापर्वी, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्ते ट्रान्सफर केले आहेत. बियाने आणि खतांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनाही पैशांची आवश्यकता आहे. जर पीएम क‍िसानच्या पैशांत वाढ करण्यात आली, तर एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो.
टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी