शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 'या' मोठ्या योजना; एका योजनेत दरवर्षी मिळतात 10 हजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 12:46 PM

1 / 8
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीसाठी शासन सर्व प्रकारच्या योजना राबवत आहे. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना घेतला जात आहे.
2 / 8
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मे महिन्यातही 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने 2-2 हजार रुपये पाठवले होते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. पण सरकारच्या अनेक योजना आहेत, ज्यांची लोकांना माहिती नाही. शेतकऱ्यांसाठी चालवल्या जात असलेल्या योजनांची माहिती घेऊया...
3 / 8
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतात सौरपंप बसवण्यासाठी 60 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. एवढेच नाही तर सरकारकडून 30 टक्क्यांपर्यंत कर्जही दिले जाते. देशातील शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि शेतात सौर पंप किंवा ट्यूबवेल बसवू शकतात.
4 / 8
कुसुम योजनेसारखीच ट्यूबवेल योजना उत्तर प्रदेश सरकार चालवत आहे. ही योजना फक्त उत्तर प्रदेश सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ उत्तर प्रदेशातील शेतकरीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेत तुम्ही तुमच्या शेतात ट्यूबवेल बसवू शकता. यासाठी तुम्ही UPPCL च्या www.upenergy.in या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकता.
5 / 8
ही योजना छत्तीसगड सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धान पिकावर लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या धान पिकाची योग्य रक्कम बँकांमार्फत दिली जाते. यासाठी छत्तीसगड सरकारने चालू आर्थिक वर्षात 5700 कोटींची रक्कम दिली आहे, जी शेतकऱ्यांना 4 हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे.
6 / 8
ही योजना तेलंगणा सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी चालवते. याअंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ज्यांच्या नावावर जमीन आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
7 / 8
पीएम किसान मानधन योजना केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येत आहे. यामध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वयानुसार प्रीमियम भरावा लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही 18 वर्षांचे असाल, तर तुम्हाला दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल.
8 / 8
केंद्र सरकार चालवत असलेली ही योजना देशात सर्वाधिक लोकप्रिय आहे. देशभरातील 10 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करते.
टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना