PM Kisan update benefit of pm kisan samman nidhi will not be available without ration card
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; चार दिवसांत जमा करा 'ही' कागदपत्रे, अन्यथा... By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:55 AM1 / 9नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता किसान योजनेत (PM KISAN Installment) नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच रेशनकार्डशिवाय आता किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.2 / 9आता पीएम किसान पोर्टलवर रेशनकार्ड क्रमांक नोंद केल्यानंतरच या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. आता या योजनेअंतर्गत नवीन नोंदणीवर रेशनकार्ड क्रमांक देणे बंधनकारक (Ration Card Mandatory)असेल. तसेच, रेशन कार्ड अनिवार्य असण्यासोबतच, आता नोंदणीच्यावेळी केवळ कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी (PDF) बनवून पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील.3 / 9याअंतर्गत आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करण्याची अनिवार्यता सुद्धा रद्द करण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना या कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक होणार आहे.4 / 91) तुमच्याकडे बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे, कारण सरकार DBT द्वारे शेतकऱ्यांना पैसे ट्रान्सफर करते. 2) तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले म्हणजेच लिंक असणे आवश्यक आहे. 3) तुमच्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय, तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.5 / 94) पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर तुमची कागदपत्रे अपलोड करा. 5) आधार लिंक करण्यासाठी तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि Edit Aadhaar Detail या ऑप्शनवर क्लिक करून अपडेट करा.6 / 9या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 9 वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला नाही, त्यांना आता पुढील हप्त्यासोबत मागील रक्कमही मिळणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता 4000 रुपये मिळणार आहेत. 7 / 9पण आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे. तुम्ही देखील अर्ज केला असेल आणि तो मंजूर झाला असेल तर तुम्हाला 4000 रुपये मिळतील.8 / 9पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आता शेतकरी दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. 9 / 9पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांचे तीन हप्ते, म्हणजेच वर्षाला 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना थेट आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications