PM Narendra Modi Meets Nvidia's CEO Jensen Huang, Discuss India's Potential In AI
ज्या व्यक्तीच्या मागे लागलंय अख्खं जग; तो पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काय करतोय? By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 2:03 PM1 / 10एआय चीप (AI Chip) बनवणारी अमेरिकन कंपनी एनवीडियओ कॉर्प(Nvidia Corp) मागील काही महिन्यांपासून चर्चेत आली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या जगातील बड्या टेक कंपन्यांमध्ये एनवीडियाकडून जास्तीत जास्त चीप घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे. 2 / 10सौदी अरब आणि यूएईतील कंपन्याही हजारो चीप खरेदी करत आहेत. चीनची कंपनी टेंसेट आणि अलीबाबा हेदेखील एनवीडियाच्या दरवाज्यावर उभ्या आहेत. त्यामुळे एनवीडियाची जगभरात किती डिमांड आहे याचा अंदाज तुम्हाला नक्की आला असेल. 3 / 10चॅटबॉट आणि इतर टूल्सच्या वाढत्या वापरामुळे पुढील काळात यात आणखी तेजी येऊ शकते. त्यातच कंपनीचे सीईओ जेनसन हुआंग(Jensen Huang) यांनी मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 4 / 10मोदी यांनी हुआंग यांच्यासोबत भेटीनंतर ट्विट केले आहे. या बैठकीत एआयच्या जगात भारताचा प्रवेश आणि विस्ताराबाबत चर्चा झाली. त्याचसोबत भारताने या सेक्टरमध्ये जे पाऊल उचलले त्याचे कौतुक हुआंग यांनी केले. भारतातील टॅलेंटेड युवकांबद्दलही हुआंग खूप उत्साही होते असं सांगितले गेले. 5 / 10हुआंग यांच्या कंपनीनेही ट्विट करत भारताला ग्लोबल टेक्नोलॉजीचे सुपरपॉवर म्हटलं आहे. हुआंग आणि पंतप्रधान मोदी यांची ही भेट आमच्या आणि ग्लोबल टेक्नोलॉजी सुपरपॉवरमध्ये वाढत्या भागीदारीचे संकेत आहेत असं कंपनीने म्हटलं आहे. 6 / 10कोण आहे जेनसन हुआंग? – एनवीडियाची स्थापना जेनसन हुआंग यांनी केली. त्यांचा जन्म तैवानमध्ये १९६३ मध्ये झालाय. १९७३ मध्ये त्यांच्या आई वडिलांनी अमेरिकेतील नातेवाईकांकडे पाठवले. Nvidia ची स्थापना एप्रिल १९९३ मध्ये करण्यात आली आहे. सुरुवातीला ही कंपनी व्हिडिओ गेम ग्राफिक्स चिप्स बनवत होती. 7 / 10जेव्हा कंपनीचे शेअर १०० डॉलरवर पोहचले तेव्हा हुआंग यांनी त्यांच्या दंडावर कंपनीचा लोगो टॅटू काढला. एनवीडिया ही सध्या १.९९ ट्रिलियन डॉलरसह जगातील सहावी आणि अमेरिकेतील पाचवी व्हॅल्यूएबल कंपनी आहे. या कंपनीची मार्केट व्हॅल्यू मार्क जुकरबर्ग, एलन मस्क यांच्या टेस्लाहून अधिक आहे. 8 / 10हुआंग ४३.२ अरब डॉलर संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत २७ व्या नंबरवर आहेत. यंदाच्या वर्षी त्यांच्या संपत्तीत २९.४ अब्ज डॉलर वाढ झाली आहे. एनवीडियामध्ये त्यांची ३.५ टक्के भागीदारी आहे. कोरोना काळातही या कंपनीचे शेअर्स वाढले होते. 9 / 10आगामी काळात एआय कॅम्प्युटर क्रांतीत पुढाकार घेणार आहेत. त्याचा वापर खूप सोपा असेल. त्यासाठी कंपनी वेगाने वाटचाल करत आहे. जगभरातील कंपन्या पॉवरफुल कॅम्प्युटरच्या दिशेने पुढे येत आहेत. जो चॅटजीपीटी, जेनरेटिव्ह एआय हँडल करू शकेल असं हुआंग यांनी म्हटलं. 10 / 10२००४ मध्ये एनवीडियाने भारतात त्यांचे पाऊल रोवले. कंपनीचे भारतात ४ इंजिनिअर डेव्लहपमेंट सेंटर आहे. हे सेंटर गुरुग्राम, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू येथे आहेत. देशात कंपनीचे ३८०० हून अधिक कर्मचारी आहेत. इतकेच नाही तर भारतातील ३२०००० हून अधिक डेव्ल्हपर एनवीडिया डेवलप कार्यक्रमाचा भाग आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications