pm pension yojana know pm vaya vandana yojana feature and benefits see here what to do
PM Pension Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची सुपरहिट पेन्शन स्कीम; मिळतील 1.1 लाख रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 1:26 PM1 / 9नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी (senior citizens) एक आनंदाची बातमी आहे. आता सरकारने 60 वर्षांवरील लोकांसाठी 'पीएम वय वंदना योजना' (PM Vaya Vandana Yojana)सुरू केली आहे. या अंतर्गत, तुम्हाला वार्षिक 1,11,000 रुपयांपर्यंत पेन्शन (Senior Citizens Savings Scheme) मिळू शकते.2 / 9ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्याच्या निर्णायक टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी 'पीएम वय वंदना योजना' सुरू करण्यात आली आहे. त्याचा कालावधी 31 मार्च 2020 पर्यंत होता, परंतु आता तो मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे.3 / 9या योजनेत सामील होण्यासाठी किमान वय 60 वर्षे आहे. म्हणजेच 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या अंतर्गत कमाल वयोमर्यादा नाही.4 / 9या योजनेत एखादी व्यक्ती कमाल 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. ही योजना चालवण्याची जबाबदारी आयुर्विमा महामंडळावर (LIC) सोपवण्यात आली आहे. या योजनेत पेन्शनसाठी, तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल. आणि मग तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनची निवड करू शकता.5 / 9पीएम वय वंदना योजनेंतर्गत, तुम्हाला दरमहा 1000 रुपये पेन्शनसाठी 1,62,162 रुपये गुंतवावे लागतील. या योजनेंतर्गत, कमाल मासिक पेन्शन 9,250 रुपये, तिमाही 27,750 रुपये, सहामाही पेन्शन 55,500 रुपये आणि वार्षिक पेन्शन 1,11,000 रुपये आहे.6 / 9पीएम वय वंदना योजनेबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्ही 022-67819281 किंवा 022-67819290 नंबरवर कॉल करू शकता. याशिवाय, तुम्ही टोल-फ्री नंबर - 1800-227-717 देखील डायल करू शकता.7 / 9या योजनेला सेवा कर (Service Tax) आणि जीएसटीमधून (GST) सूट देण्यात आली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराच्या किंवा जोडीदाराच्या उपचारासाठी हे पैसे वेळेपूर्वी काढू शकता.8 / 9पीएम वय वंदना योजनेतील गुंतवणुकीसाठी तुमच्याजवळ पॅन कार्ड, अॅड्रेस प्रूफ आणि बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी असणे अनिवार्य आहे.9 / 9पीएम वय वंदना योजनेत तुमच्यासाठी कर्जाची सुविधाही आहे. यामध्ये तुम्ही पॉलिसीच्या 3 वर्षानंतर पीएम वय वंदना योजनेवर कर्ज घेऊ शकता. कर्जाची कमाल रक्कम खरेदी किमतीच्या 75% पेक्षा जास्त असू शकत नाही. ही योजना सरकारच्या इतर पेन्शन योजनांप्रमाणे कर लाभ देत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications