pm svanidhi yojana how to take rs 50000 loan without any guarantee details govt loan scheme
मोदी सरकारच्या 'या' योजनेद्वारे मिळवा कोणत्याही हमीशिवाय ५० हजारांपर्यंत कर्ज! By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 5:06 PM1 / 7नवी दिल्ली : देशात कोरोना संकटाच्या काळात मोदी सरकारने एक योजना सुरू केली होती, जी आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. कारण, या योजनेत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय म्हणजेच गॅरंटीशिवाय मिळते. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी आहे, जे लहान नोकरी करतात, परंतु काही कारणास्तव ते त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करू शकत नाहीत किंवा सुरवातीपासून लहान व्यवसाय सुरू करू इच्छितात. 2 / 7पीएम स्वनिधी योजना (pm svanidhi yojana) असे या सरकारी योजनेचे नाव आहे. ही योजना खासकरून रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आहे, ज्यांच्या रोजगाराची कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली. मात्र या योजनेचे यश पाहून सरकारने योजनेची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेंतर्गत रोजगार सुरू करण्यासाठी सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे.3 / 7पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत, सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कर्ज देते. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फास्ट फूडची छोटी दुकाने चालवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.4 / 7केंद्र सरकार पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देते. पण 50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. त्यामुळे या योजनेअंतर्गत कोणालाही 10,000 रुपयांचे पहिले कर्ज मिळेल. एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.5 / 7आता समजा एखाद्याला बाजारात रस्त्याच्या कडेला चाटचे दुकान लावायचे आहे. त्यासाठी त्याने स्वनिधी योजनेंतर्गत 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी कर्जाची रक्कम वेळेवर परत केली. अशा परिस्थितीत ती व्यक्ती दुसऱ्यांदा या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकते. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी तो पात्र ठरणार आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावर सबसिडी देखील देते.6 / 7या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी आवश्यक नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम तीन वेळा तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी कॅश-बॅकसह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या योजनेच्या बजेटमध्ये वाढ केली होती.7 / 7पीएम स्वनिधी योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. तुम्ही दरमहा कर्जाची रक्कम हप्त्यांमध्ये परत करू शकता. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करता येतो. आणखी वाचा Subscribe to Notifications