शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' बँकेत १ एप्रिलपासून काही बदल होणार, लगेच बँकेशी संपर्क करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 11:37 AM

1 / 10
नवी दिल्ली : जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. 31 मार्चपूर्वी, हे महत्त्वाचे काम आपल्याकडे करा, अन्यथा तुम्हाला व्यवहार करण्यास अडचण येऊ शकेल.
2 / 10
दरम्यान, 1 एप्रिलपासून बँकेत काही बदल होणार आहेत, त्यानुसार, जुन्या आयएफएससी (IFSC) आणि एमआयसीआर (MICR) कोडचा वापर ग्राहकांना करता येणार नाहीत.
3 / 10
31 मार्चपर्यंत बँकेला बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजेच 31 मार्च 2021 नंतर हे कोड काम करणार नाहीत. जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला बँकेतून एक नवीन कोड घ्यावा लागेल.
4 / 10
तसे न झाल्यास, 1 एप्रिलपासून ग्राहक ऑनलाइनच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार करू शकणार नाहीत. बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.
5 / 10
पीएनबीमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय) या दोन सरकारी बँकांचे विलीनीकरण झाले आहे. 1 एप्रिल 2020 पासून हे विलीनीकरण पीएनबीमध्ये होत आहे.
6 / 10
त्यामुळे या दोन्ही बँकांचे ग्राहक आता पीएनबीचे ग्राहक झाले आहेत. या विलीनीकरणानंतर पीएनबी सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बँक बनली आहे.
7 / 10
यानंतर आता पीएनबीने ग्राहकांना नवीन चेकबुक आणि आयएफएससी आणि एमआयसीआर कोड घेण्यास सांगितले आहे.
8 / 10
दरम्यान, पीएनबीमध्ये विलीनीकरणानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या सर्व शाखा आता पीएनबीच्या शाखा म्हणून कार्यरत आहेत. आता बँकेच्या 11,000 हून अधिक शाखा आणि 13,000 पेक्षा जास्त एटीएम कार्यरत आहेत.
9 / 10
पीएनबी बँकेने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक टोल फ्री नंबर शेअर केला आहे, ज्याद्वारे ग्राहक यासंदर्भातील सर्व माहिती बँकेत कॉल करून घेऊ शकतात.
10 / 10
ग्राहक बँकेच्या टोल फ्री क्रमांक 18001802222/18001032222 वर कॉल करू शकतात. विलीनीकरणानंतर पीएनबीमध्ये सामील झालेल्या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना आता नवीन चेकबुक आणि नवीन आयएफएससी कोड मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकbankबँकbusinessव्यवसायIndiaभारतMONEYपैसाonlineऑनलाइन