शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून 'या' ATM मधून पैसे काढता येणार नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 11:05 PM

1 / 8
नवी दिल्ली : देशातील वाढती एटीएम फसवणूक रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) एक मोठे पाऊल उचलले आहे. जर तुमचेही पंजाब नॅशनल बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
2 / 8
1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँकेने ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम (Non-EMV ATM) मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत.
3 / 8
म्हणजेच, तुम्ही नॉन-ईव्हीएम मशीनमधून पैसे काढू शकणार नाही. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.
4 / 8
पंजाब नॅशनल बँकेने ट्विट केले की, 'आपल्या ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी 1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँक नॉन- ईएमव्ही एटीएम मशीनमधील ट्रांजक्शनवर (financial & non-financial) प्रतिबंधित करेल. गो-डिजिटल, गो-सेफ ...!'
5 / 8
वाढत्या फसवणूकीच्या घटना लक्षात घेता पंजाब नॅशनल बँकेने हे पाऊल उचलले आहे. जेणेकरुन ग्राहकांचे पैसे सुरक्षित असतील. 1 फेब्रुवारीपासून ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएममधून फायन्सशियल किंवा नॉन-फायन्सशियल व्यवहार करू शकणार नाहीत.
6 / 8
दरम्यान, नॉन-ईएमव्ही एटीएम असे आहेत, ज्यामध्ये ट्रांजक्शनच्यावेळी कार्ड ठेवले जात नाही. यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रिपच्या माध्यमातून डेटा रीड केला जातो. याशिवाय, ईएमव्ही एटीएममध्ये काही सेकंदांसाठी कार्ड लॉक केले जाते.
7 / 8
अलीकडेच, पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना PNBOne अ‍ॅपद्वारे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड चालू / बंद करण्याची सुविधा दिली आहे.
8 / 8
यानुसार, तुम्ही तुमचे कार्ड वापरल्यास नसाल तर ते बंद करू शकता. यामुळे आपल्या बँक खात्यात ठेवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील.
टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकbankबँकatmएटीएम