post office fd vs sbi pnb hdfc bank icici bank and bank of baroda fixed deposit rate for one year
Post Office ची एक वर्षाची एफडी 'या' पाच मोठ्या बँकांना भारी; जाणून घ्या, किती मिळतंय व्याज? By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 4:29 PM1 / 8रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो दरात वाढ केल्यानंतर अलीकडच्या काळात अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात वाढ केली आहे. म्हणजेच त्यांच्या एफडीवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज दिले जात आहे.2 / 8पोस्ट ऑफिस एफडी म्हणून ओळखल्या जाणार्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office time deposit) योजना इतर मोठ्या बँकांवर भारी पडत आहे. एका वर्षाच्या एफडीचा विचार केला तर पोस्ट ऑफिस पाच मोठ्या बँकांच्या पुढे आहे.3 / 8देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील एका वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर (SBI Domestic term deposits) 5.10 टक्के व्याज दर लागू करते.4 / 8तुम्ही खाजगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) एका वर्षासाठी एफडी केल्यास, तुम्हाला वार्षिक 5.10 टक्के व्याज दिले जाईल. हा दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर लागू आहे.5 / 8जर तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकमध्ये (PNB) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची एक वर्षाची एफडी केली, तर वार्षिक 5.10 टक्के व्याजदर दिला जातो.6 / 8अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्ही खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची 1 वर्ष ते 389 दिवसांसाठी एफडी केली तरीही तुम्हाला वार्षिक 5.10 टक्के व्याजदर दिला जात आहे.7 / 8सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर कमी एफडी व्याज देत आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुम्ही एका वर्षासाठी एफडी केली तर तुम्हाला वार्षिक फक्त 5.0 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच वर नमूद केलेल्या बँकांपेक्षा कमी परतावा आहे.8 / 8जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) एका वर्षासाठी टाइम डिपॉझिट स्कीममध्ये (Post Office time deposit interest rate)गुंतवणूक केली तर सध्या तुम्हाला 6.50 टक्के व्याज मिळत आहे. हा दर वरील पाच बँकांच्या एका वर्षाच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications