post office jan dhan account holder get 2 lakh rupees free benefits check know how
जर तुमचेही Post Office मध्ये 'हे' खाते असेल तर मिळेल 2 लाखांचा फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:18 PM1 / 9नवी दिल्ली : जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जनधन खाते (JanDhan Account)उघडले तर तुम्हाला 2 लाखांचा लाभ मिळेल. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) देशातील गरीबांचे खाते झिरो बॅलन्सवर बँक, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते. 2 / 9पंतप्रधान जन धन योजनेद्वारे उघडलेल्या खात्यांमध्ये ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. या खात्यात कोणती आकर्षक सुविधा उपलब्ध आहेत आणि हे खाते कसे उघडायचे ते आज जाणून घेऊया. तसेच, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्यांचे खाते आधारशी जोडले जाईल त्यांनाच या खात्यासह उपलब्ध सुविधांचा लाभ मिळेल.3 / 9आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, वोटर कार्ड, NREGA जॉब कार्ड किंवा नाव, पत्ता आणि आधार क्रमांक दर्शविणारे प्राधिकरणाने जारी केलेले पत्र तुमच्याकडे असल्यास तुम्ही जन धन खाते उघडू शकता. 4 / 9जर तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस ला भेट देऊन हे काम सहज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. 5 / 9फॉर्ममध्ये नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि आश्रितांची संख्या, एसएसए कोड किंवा वॉर्ड क्रमांक, गाव कोड किंवा टाऊन कोड इत्यादी माहिती द्यावी लागेल.6 / 9जर तुमचे जुने बँक खाते असेल तर ते जन धन खात्यात रूपांतरित करणे सोपे आहे. यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचे बँक खाते जन धन योजनेत हस्तांतरित केले जाईल.7 / 96 महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण दिले जाते. तसेच, 30,000 रुपयांपर्यंतचा लाइफ कव्हर, जो लाभार्थीच्या मृत्यूवर पात्रता अटी पूर्ण झाल्यानंतर मिळतो. 8 / 9याशिवाय, डिपॉझिटवर व्याज मिळते आणि मोफत मोबाईल बँकिंग सुविधा देखील प्रदान केली जाते. रुपे डेबिट कार्ड जन धन खाते उघडणाऱ्याला दिले जाते, ज्यामधून तो खात्यातून पैसे काढू शकतो किंवा खरेदी करू शकतो. 9 / 9जन धन खात्याद्वारे विमा, पेन्शन उत्पादने खरेदी करणे सोपे आहे. जन धन खाते असल्यास, पीएम किसान आणि श्रमयोगी मानधन सारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडले जाईल. तसेच, देशभरात पैसे हस्तांतरणाची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, सरकारी योजनांच्या लाभाचे थेट पैसे खात्यात येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications