शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office KVP: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, आता एका महिन्यापूर्वीच पैसे होणार दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 8:13 PM

1 / 8
Post Office Investment : पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामुळे देशातील लाखो लोकांनी पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणूक केली आहे. उत्कृष्ट परताव्यामुळे पोस्टाच्या अनेक योजना लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. यापैकी एक म्हणजे किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra).
2 / 8
अलीकडेच सरकारने किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवरील व्याजदरात वाढ केली होती. यासोबतच पैसे दुप्पट होण्याचा कालावधीही कमी झाला आहे. जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता.
3 / 8
पैसे दुप्पट करण्यासाठी लोक किसान विकास पत्रातही गुंतवणूक करतात. पैसे दुप्पट करण्यासाठी किसान विकास पत्र ही एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. अलीकडेच सरकारने पैसे दुप्पट करण्याचा कालावधीही कमी केला होता. यासोबतच व्याजदरही वाढले आहेत.
4 / 8
यापूर्वी किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर ६.९ टक्के दराने व्याज मिळत होते. मात्र सरकारने आता ते ७.० टक्के केले आहे. आता तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला नवीन व्याजदरानुसार परतावा मिळेल.
5 / 8
किसान विकास पत्रातील गुंतवणुकीची रक्कम पहिले १२४ महिन्यांत दुप्पट होती. परंतु कालावधी कमी केल्यानंतर, आता गुंतवणूकदारांची रक्कम एक महिना पूर्वीच दुप्पट होईल, म्हणजे १२३ महिन्यांत (१० वर्षे आणि तीन महिने). हा बदल १ ऑक्टोबरपासून लागू झाला आहे.
6 / 8
या योजनेअंतर्गत कोणीही १ हजार रुपये गुंतवून खाते उघडू शकतो. गुंतवणूकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. १८ किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाला भेट देऊन या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता.
7 / 8
तुम्ही देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किसान विकास पत्र अंतर्गत खाते उघडू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेत, १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने कोणतेही प्रौढ व्यक्ती खाते उघडू शकते. अल्पवयीन व्यक्तीचे वय १० वर्षे पूर्ण होताच त्याच्या नावावर खाते हस्तांतरित केले जाते. किसान विकास पत्रामध्ये, १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे तीन लोक एकाच वेळी संयुक्त खाते उघडू शकतात.
8 / 8
जर कोणी ही योजनेचा लाभ घेतला आणि एक वर्षाच्या आत बंद केली तर त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही. किसान विकास पत्र योजना सुरू करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. यानंतर जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर गुंतवणूकीची रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल. अर्जासोबत तुमचे ओळखपत्रही जोडावे. अर्ज आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला किसान विकास पत्राचे प्रमाणपत्र मिळेल.
टॅग्स :businessव्यवसायPost Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक