शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PO Investment Scheme : महिन्याला इन्कम देणारी पोस्टाची स्कीम! ५,७,९,१२,१५ लाख जमा केल्यास किती होणार कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 8:34 AM

1 / 7
पोस्ट ऑफिसद्वारे अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम. या योजनेतून तुम्हाला मासिक उत्पन्न मिळणार आहे. या योजनेत तुम्ही सिंगल अकाउंटमध्ये ९ लाखांपर्यंत आणि जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता.
2 / 7
ही रक्कम ५ वर्षांसाठी जमा केली जाते. तुमच्या जमा रकमेवर व्याजातून कमाई होते. सध्या त्यावर ७.४ टक्के दरानं व्याज मिळत आहे. ५, ७, ९, १२ आणि १५ लाख रुपये जमा करून तुम्ही दर महिन्याला किती कमाई करू शकता हे आज आपण जाणून घेऊ.
3 / 7
या योजनेमध्ये तुम्हाला उत्तम व्याज दिलं जातं. जर तुम्ही पीओएमआयएसमध्ये ५,००,००० रुपये जमा केले तर ७.४ टक्के दरानं तुम्हाला दरमहा ३,०८३ रुपये मिळतील.
4 / 7
पीओएमआयएसमध्ये ७,००,००० रुपये जमा करून तुम्ही ५ वर्षांसाठी दरमहा ४,३१७ रुपये कमवू शकता. जर तुम्हाला ५ वर्षांनंतरही कमाई सुरू ठेवायची असेल तर तुम्ही हे खातं पुन्हा उघडू शकता.
5 / 7
तुम्ही सिंगल खात्यात जास्तीत जास्त ९,००,००० रुपये जमा करू शकता. ९ लाख रुपये जमा केल्यास तुम्ही दरमहा ५,५०० रुपयांपर्यंत कमाई करू शकता.
6 / 7
या खात्यात १२,००,००० रुपये जमा करण्यासाठी तुमचं खातं संयुक्त खातं असणं आवश्यक आहे. या रकमेवरील ७.४% व्याजदरानुसार तुम्ही दरमहा ७,४०० रुपये कमवू शकता.
7 / 7
पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त १५,००,००० रुपये जमा करता येतात. यामध्ये तुम्ही दरमहा ९,२५० रुपयांपर्यंत कमाई करू शकता.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक