शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office ची खास स्कीम, पती-पत्नीला मिळेल 59,400 रुपयांचा फायदा, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 9:35 AM

1 / 11
नवी दिल्ली : तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office) विविध योजना राबविल्या जातात. तसेच, या योजनेतील गुंतवणुकीच्या पैशाची पूर्णपणे हमी असते, म्हणजेच तुमच्या पैशाला कोणताही धोका नाही. अशीच एक पोस्ट ऑफिसची योजना आहे, ज्याद्वारे पती-पत्नी दोघेही मिळून दर महिन्याला कमाई करू शकतात.
2 / 11
पोस्ट ऑफिसद्वारे एक विशेष योजना राबविली जाते, ज्याद्वारे पती आणि पत्नी दोघेही वार्षिक ५९,४०० रुपये कमवू शकतात. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना ((Post Office MIS) आहे.
3 / 11
ज्या याजनेद्वारे तुम्हाला दर महिन्याला निश्चित कमाई मिळते. जर तुम्ही मासिक कमाईचा विचार केला तर तुम्ही दरमहा 4950 रुपये कमवू शकता. तुम्ही या योजनेसाठी संयुक्त खातेदेखील उघडू शकता.
4 / 11
त्यामुळे त्याचे दरमहा १२ भाग केले जातात. हा एक भाग आहे जो तुम्हाला दर महिन्याला तुमच्या खात्यात मागवू शकता. जर तुम्हाला मासिक आधारावर त्याची गरज नसेल, तर मूळ रक्कमेला जोडून त्यावर व्याज मिळते.
5 / 11
एमआयएस योजनेत खाते सिंगल आणि संयुक्त दोन्ही प्रकारे उघडले जाऊ शकते. वैयक्तिक खाते उघडताना तुम्ही या योजनेत किमान १,००० रुपये आणि जास्तीत जास्त ४.५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. मात्र, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करू शकता. ही योजना सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप फायदेशीर आहे.
6 / 11
एमआयएस योजनेची चांगली गोष्ट म्हणजे दोन किंवा तीन लोक मिळून संयुक्त खाते देखील उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारी कमाई प्रत्येक सदस्याच्या कमाई इतकीच असते.
7 / 11
तुम्ही कोणत्याही वेळी संयुक्त खाते एकाच खात्यात रूपांतरित करू शकता. तुम्ही एकाच खात्याचे संयुक्त खात्यात रूपांतर करू शकता. खात्यात कोणताही बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांना संयुक्त अर्ज द्यावा लागतो.
8 / 11
या योजनेत सध्या तुम्हाला वार्षिक व्याज ६.६ टक्के दराने मिळत आहे. या योजनेअंतर्गत, तुम्हाला एकूण ठेवीवर वार्षिक व्याज दराने परतावा मोजला जातो. तुमचा एकूण परतावा वार्षिक आधारावर आहे.
9 / 11
त्यामुळे त्याचे दरमहा १२ भाग केले जातात. हा एक भाग आहे जो तुम्हाला दर महिन्याला तुमच्या खात्यात मागवू शकता. जर तुम्हाला मासिक आधारावर त्याची गरज नसेल, तर मूळ रक्कमेला जोडून त्यावर व्याज मिळते.
10 / 11
समजा, या योजनेअंतर्गत पती-पत्नीने संयुक्त खात्यात ९ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. ६.६ टक्के व्याजदराने ९ लाख रुपयांच्या ठेवींवर वार्षिक परतावा ५९,४०० रुपये असेल. १२ भागांमध्ये विभागल्यास ते मासिक ४९५० रुपये असेल.
11 / 11
म्हणजे तुम्ही दरमहा तुमच्या खात्यात ४९५० रुपये मागवू शकता. तसेच तुमची गुंतवणुकीची मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहतील. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही योजना ५ वर्षांनंतर आणि ५-५ वर्षांसाठी वाढवू शकता.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसbusinessव्यवसायMONEYपैसा