शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 10:44 AM

1 / 9
नवी दिल्ली : पोस्ट ऑफिस (Post Office) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमचेही पोस्टात खाते असल्यास आजच जाणून घ्या अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. दरम्यान, 1 एप्रिल 2021 पासून पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी काही नवीन नियम लागू केले जात आहेत.
2 / 9
मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, India Post Payment Banks ने आता पैसे काढणे, जमा करणे आणि AEPS (आधार आधारित पेमेंट सिस्टम) वर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 9
म्हणजेच, पैसे जमा करण्यास आणि पैसे काढण्यासाठी आपल्याला शुल्क देखील द्यावे लागेल. हा नियम कोणत्या खात्यांवर लागू होईल, ते जाणून घ्या...
4 / 9
तुमच्याकडे बेसिक बचत खाते असल्यास तुम्हाला 4 वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, परंतु त्याहून अधिक व्यवहारासाठी तुम्हाला 25 रुपये किंवा 0.5 टक्के शुल्क भरावे लागेल. तर, पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
5 / 9
तुमचे बचत आणि चालू खाते असल्यास तुम्हाला दरमहा 25000 रुपये काढू शकता. यापेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी तुम्हाला 25 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याचवेळी, जर तुम्ही10,000 रुपयांपर्यंत रोख रक्कम जमा केली तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु जर आपण यापेक्षा अधिक रक्कम जमा केली तर प्रत्येक ठेव कमीतकमी 25 रुपये आकारले जातील.
6 / 9
आयपीपीबी नेटवर्कवर अमर्यादित विनामूल्य व्यवहार आहेत, परंतु नॉन-आयपीपीबीसाठी केवळ तीन विनामूल्य व्यवहार केले जाऊ शकतात. हे नियम मिनी स्टेटमेंट, रोख रक्कम काढणे आणि रोख ठेव यासाठी आहेत. एईपीएसमध्ये विनामूल्य मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर शुल्क भरावे लागेल. मर्यादा संपल्यानंतर कोणत्याही ठेवीवर २० रुपये शुल्क आकारले जाईल.
7 / 9
जर ग्राहकांना मिनी स्टेटमेंट काढायचे असेल तर त्यासाठी त्यांना 5 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही मर्यादा संपल्यानंतर पैशाचा व्यवहार केला तर तुमच्या खात्यातून व्यवहाराच्या रकमेपैकी 1% वजा केला जाईल, जो किमान 1 रुपये आणि जास्तीत जास्त 25 रुपये आहे. या शुल्कावर जीएसटी आणि उपकर देखील आकारला जाईल.
8 / 9
या व्यतिरिक्त भारतीय पोस्टने जाहीर केले आहे की, पोस्ट ऑफिस जीडीएस (ग्रामीण डाक सेवा) शाखांमध्ये पैसे काढण्याची मर्यादा वाढवणार आणि आता ही मर्यादा 5000 रुपयांवरून वाढून 20000 प्रति ग्राहक करण्यात आली आहे. वेळोवेळी पोस्ट ऑफिसमधील ठेवी वाढविणे हा यामागील उद्देश आहे.
9 / 9
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यात किमान 500 रुपये असले पाहिजेत आणि ही रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असल्यास 100 रुपये शुल्क वजा केले जाईल. तसेच, जर खात्यास पैसे नसले तर खाते रद्द (टर्मिनेट) केले जाईल.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसMONEYपैसाbusinessव्यवसाय