शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office RD Scheme : रोज वाचवा ३३३ रूपये, तयार होईल १६ लाखांचा फंड; समजून घ्या पोस्टाची स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 2:32 PM

1 / 8
Post Office RD Scheme : सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच सॅलरिड आणि मध्यम वर्गीयांसाठी मोठी गुंतवणूक करणं सोपं नसतं. अशा परिस्थितीत एक छोटी गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. पोस्ट ऑफिसची आरडी स्कीम यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
2 / 8
या स्कीममध्ये तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करता. यालाच पोस्ट ऑफिस आरडी अकाऊंटही (Post Office Recurring Deposite Account) म्हटलं जातं. याद्वारे तुम्ही महिन्याला १० हजार म्हणजेच दररोज ३३३ रूपयांच्या गुंतवणूकीसोबत १० वर्षांमध्ये एक मोठा फंड तयार करू शकता.
3 / 8
पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये १० वर्षांपेक्षा अधिक वयाची कोणतीही व्यक्ती खातं उघडू शकते. यात तुम्ही किमान १०० रूपयांच्या रकमेनंही गुंतवणूक सुरू करू शकता. ही योजना सरकारच्या गॅरंटी योजनेसह येते. यात कमाल गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही.
4 / 8
सध्या या स्कीमवर वार्षिक ५.८ टक्क्यांचं व्याज दिलं जातं. हे दर जुलै २०२२ पासून लागू करण्यात आले आहेत. केंद्र सरकार आपल्या सर्वच छोट्या बचत योजनांवरील व्याजदर दर तिमाहीला निश्चित करत असतं.
5 / 8
पोस्ट ऑफिसचं आरडी अकाऊंट सुरू केल्याच्या ५ वर्षांनंतर किंवा ६० वर्षांनी मॅच्युअर होतं. या आरडीला तुम्ही १० वर्षांच्या कालावधीसाठी पुढे वाढवू शकता. परंतु तुम्ही तीन वर्षांनंतर हे खातं बंदही करू शकता किंवा अकाऊंट सुरू केल्यानंतर एका वर्षानं तुम्ही ५० टक्के कर्जही घेऊ शकता.
6 / 8
जर हे खातं पूर्णपणे बंद झालं आणि जरी मॅच्युरिटीच्या एक दिवस आधीही ते बंद केलं तर यावर सेव्हिंग अकाऊंटप्रमाणेच व्याज दिलं जातं. पोस्ट ऑफिसचं हे आरडी अकाऊंट विना पैसे जमा करता ५ वर्षांपर्यंत सुरू राहू शकतं.
7 / 8
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये १० हजार रूपये दर महिन्याला १० वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला १० वर्षांनी ५.८ टक्के व्याजदरानुसार १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळेल.
8 / 8
१० वर्षांमध्ये तुम्ही एकूण १२ लाख रूपये जमा कराल. तुम्हाला त्यावर ४.२६ लाख रूपये रिटर्न मिळतील. या प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर १६.२६ लाख रूपयांची रक्कम मिळेल. या पैशांवर तिमाही स्वरूपानं व्याज दिलं जातं. प्रत्येक तिमाहीच्या अखेरिस अकाऊंटमध्ये हे व्याज जमा केलं जातं.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकIndiaभारत