शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी खुशखबर! NEFT सेवा सुरू, लवकरच RTGS सुविधा उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 2:32 PM

1 / 7
नवी दिल्ली : पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसने (Post Office) आपल्या छोट्या बचत खात्यात लोकांना आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) सारख्या ऑनलाइन मनी ट्रान्सफर सुविधा देणे सुरू केले आहे.
2 / 7
भारतीय पोस्ट ऑफिसने 18 मे 2022 रोजी एक परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे की, ग्राहकांसाठी NEFT ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची (Online Money Transfer) सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच, पोस्ट ऑफिस लवकरच RTGS ची सुविधाही सुरू करणार आहे.
3 / 7
पोस्ट ऑफिस लवकरच आपल्या अनेक सेवा ऑनलाइन करणार आहे, अशी माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने संसदेत दिली होती. पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याशी संबंधित RTGS आणि NEFT देखील समाविष्ट आहेत. NEFT ची सुविधा 18 मे 2022 पासून सुरू झाली आहे. त्याचबरोबर RTGS ची सुविधा 31 मे पासून सुरू होणार आहे.
4 / 7
दरम्यान, पोस्ट ऑफिस भारत सरकारचे आहे, ज्याद्वारे ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. बँकेप्रमाणेच लोक पोस्ट ऑफिसमध्येही बचत खाते उघडतात आणि येथे उपलब्ध सुविधांचा लाभ घेतात. जसे की, एफडी, सेव्हिंग स्कीम, एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग इत्यादी.
5 / 7
NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, जी एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धत आहे. इलेक्ट्रॉनिक मोड ऑफ पेमेंटद्वारे, तुम्ही तुमचे पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकता. ही सेवा वर्षातील 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास उपलब्ध असते.
6 / 7
RTGS म्हणजे रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट. हे देखील एक इलेक्ट्रॉनिक मोड ऑफ पेमेंट आहे, ज्याद्वारे तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सेवा 365 दिवस आणि 24 तास देखील उपलब्ध आहे.
7 / 7
दरम्यान, प्रत्येक पोस्ट ऑफिससाठी एकच IFSC कोड जारी करण्यात आला आहे. हा कोड IPOS0000DOP आहे.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसMONEYपैसाbusinessव्यवसाय