Post Office Saving Schemes on one click; which doubles your money
Post Office च्या 'या' सुपरहिट योजना एका क्लिकवर; होतात पैसे डबल By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 9:42 AM1 / 10जर तुम्हाला तुमचा पैसा सुरक्षितपणे गुंतवायचा असेल आणि फायदाही कमवायचा असेल तर नेहमीप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये गुंतविणे सर्वात चांगले. सप्टेंबर तिमाहीमध्ये छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात सरकारने काहीच बदल केलेला नाही. (Post Office Saving Schemes which doubles your money in 10 years.)2 / 10पोस्ट ऑफिसच्या योजनांची खास बाब म्हणजे, इथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात. म्हणजे तुमचे पैसे बुडणार नाहीत. यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास योजना सांगणार आहोत, ज्यातून लवकरात लवकर तुमचे पैसे डबल होतील. (Post Office Saving Schemes on one click)3 / 10पोस्टाची ही योजना 1 ते 3 वर्षांपर्यंत टाईम डिपॉझिट (TD) वर 5.5 टक्क्यांचे व्याज मिळते. जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर 13 वर्षांत तुमचा पैसा डबल होईल. याचप्रकारे 5 वर्षांच्या डिपॉझिटवर 6.7 टक्क्यांचे व्याज मिळते. यातून तुमचा पैसा 10.75 वर्षांत डबल होईल. 4 / 10पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटमध्ये जर तुम्ही तुमचे पैसे ठेवत असाल तर तुम्हाला पैसे डबल होण्यासाठी खूप कालावधी लागेल. कारण यावर 4.0 टक्के व्याज मिळते. म्हणजे तुम्हाला पैसे डबल करण्यासाठी 18 वर्षे लागतील. 5 / 10Post Office रिकरिंग डिपॉझिट (RD) वर तुम्हाला 5.8 टक्के व्य़ाज दिले जात आहे. यामुळे यात पैसे गुंतविल्यास ते 12.41 वर्षांत डबल होतील. 6 / 10Post Office मंथली इन्कम स्कीम (MIS) मध्ये सध्या 6.6 टक्के व्याज दिले जात आहे. या व्याजदराने जर पैसे गुंतविले तर जवळपास 10.91 वर्षांत डबल होतील. 7 / 10पोस्टाच्या सिनिअर सिटिझन्स सेव्हिंग स्कीममध्ये (SCSS) 7.4 टक्क्यांचे व्याज मिळते. तुमचा पैसा या स्कीममध्ये 9.73 वर्षांत डबल होईल. 8 / 10पोस्टाच्या 15 वर्षांच्या मुदतीची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये 7.1 टक्क्यांचे व्याज दिले जाते. याद्वारे तुमचे पैसे डबल होण्यासाठी 10.14 वर्षांचा वेळ लागेल. 9 / 10पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खात्यावर सर्वाधिक व्याज देऊ करते. हा व्याजदर 7.6 टक्के आहे. मुलींसाठी ही योजना सुरु करण्यातच आली आहे. यामध्ये पैसे डबल होण्यासाठी 9.47 वर्षे लागतील. 10 / 10पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये (NSC) सध्या 6.8 टक्के व्याजदर दिला जात आहे. ही 5 वर्षांची योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून आयकरही वाचविता येऊ शकतो. या व्याजदराने जर पैसे गुंतविले तर 10.59 वर्षांत ते डबल होतील. आणखी वाचा Subscribe to Notifications