शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office Savings Scheme: रोज ४१७ रूपये गुंतवा, मॅच्युरिटीवर १ कोटी देईल ही सरकारी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 3:53 PM

1 / 5
Post Office Savings Scheme: आपल्या मेहनतीचे पैसे गुंतवताना नक्कीच तुमच्या मनात एकदा आपले पैसे तर बुडणार नाहीत असा प्रश्न आला असेल. तुमचे पैसे बुडतील या भीतीने तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
2 / 5
पोस्ट ऑफिसच्या अशा काही स्कीम्स आहेत ज्या तुम्हाला कमी गुंतवणुकीत कमी कालावधीत कोच्य बनवू शकतात. पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मधील गुंतवणूकदार छोट्या ठेवींमध्येही कोट्यवधींचा निधी उभारू शकतात. येथे तुम्ही दररोज सुमारे 417 रुपये जमा करून 1.03 कोटी रुपये जमा करू शकता.
3 / 5
पोस्ट ऑफिस बचत योजना PPF वर दरवर्षी 7.1 टक्के चक्रवाढ व्याज मिळते. या योजनेचा मॅच्युरिटीचा कालावधी 15 वर्षांचा आहे. त्यानंतर ते आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येतो. जर तुम्हाला 15 वर्षांनंतर पैशांची गरज नसेल, तर तुम्ही या फंडाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतो.
4 / 5
तुम्ही या योजनेत दरमहा 12,500 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला एका वर्षात 1.50 लाख रुपये मिळतील. त्याच वेळी, 15 वर्षांमध्ये, एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये होईल, ज्यावर तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के व्याजदर मिळेल. मॅच्युरिटीच्या वेळी, एकूण कॉर्पस 40.70 लाख रूपये असेल आणि 18.20 लाख रूपयांचे व्याज लाभ असेल.
5 / 5

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसPPFपीपीएफ