शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office Scheme : दरमहा 1500 रुपये करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 4:00 PM

1 / 8
Post Office Scheme: बाजार अनेक गुंतवणुकीच्या पर्यायांनी परिपूर्ण आहे आणि यापैकी अनेक योजनांवर दिले जाणारे परतावे देखील अतिशय आकर्षक आहेत. मात्र, यामध्ये काही योजना जोखीमेच्या देखील असतात. बरेच गुंतवणूकदार कमी परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात, कारण त्यामध्ये कमी जोखीम असते.
2 / 8
तुम्हीही कमी जोखीम परतावा किंवा गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. इंडियन पोस्टद्वारे (Indian Post) देण्यात येणारी ही ग्राम सुरक्षा योजना असाच एक पर्याय आहे, ज्यामध्ये आपण कमी जोखमीसह चांगले परतावा मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत, बोनससह योजनेची रक्कम किंवा 80 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यास, त्याचा कायदेशीर वारस नामांकित व्यक्तीला दिली जाते.
3 / 8
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. तर या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवली जाऊ शकते. या योजनेचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.
4 / 8
प्रीमियम भरण्यासाठी ग्राहकाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. पॉलिसी टर्म दरम्यान चुकीच्या स्थितीत ग्राहक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम पेमेंट करू शकतो.
5 / 8
विमा योजना एक कर्ज सुविधेसह येते, ज्याचा लाभ पॉलिसी खरेदीच्या चार वर्षानंतर मिळू शकते.
6 / 8
ग्राहक 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर करण्याचा पर्याय निवडू शकतो. मात्र, अशा परिस्थितीत आपल्याला त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इंडिया पोस्टने दिलेला बोनस आहे आणि शेवटचे जाहीर केलेले बोनस 65 रुपये प्रति 1,000 रुपये प्रति वर्ष देण्याचे आश्वासन होते.
7 / 8
जर कोणी 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी करत असेल तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपयांचा म्यॅच्युरिटी लाभ मिळेल. 60 वर्षांसाठी परिपक्वता लाभ 34.60 लाख रुपये असेल.
8 / 8
नामांकित व्यक्तीचे नाव किंवा इतर तपशीलांमध्ये जसे की, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकमध्ये कोणत्याही अपडेट प्रकरणी ग्राहक जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतो. इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेल्या टोल-फ्री हेल्पलाईन 1800 180 5232/155232 वर किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर माहितीसाठी संपर्क साधू शकतात.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकbusinessव्यवसाय