शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office ची ढासू योजना; दररोज 167 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळतील 41 लाख!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 1:15 PM

1 / 8
नवी दिल्ली : पोस्ट ऑफिस योजना मध्यमवर्गीयांमध्ये खूप पसंत केली जाते. याचे कारण असे आहे की येथे तुमचे पैसे चांगल्या रिटर्नसह पूर्णपणे सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ((PPF) देखील हीच योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दीर्घ मुदतीसाठी (लाँग टर्म) लाखो रुपयांचा निधी तयार करू शकता.
2 / 8
या योजनेत गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि तुमचे पैसे करमुक्त असतात. 16 लाख रुपयांच्या मॅच्युरिटीसाठी, तुम्हाला दररोज 167 रुपये म्हणजेच दरमहा रुपये 5000 गुंतवावे लागतील. तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यात दर महिन्याला 5,000 रुपये जमा केल्यास, 15 वर्षांच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 16 लाख रुपयांपेक्षा जास्त मिळू शकतील.
3 / 8
दरम्यान, पीपीएफ खात्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो. जर तुम्हाला तो 15 वर्षांपेक्षा जास्त काळ चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर, तुम्ही पीपीएफ खाते 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये नवीन योगदानासह सुरू ठेवू शकता. येथे आम्ही तुम्हाला 25 वर्षांची गणना सांगत आहोत. यासाठी तुम्हाला दोन वेळा 5-5 वर्षांचे ब्लॉक खाते कॅरी फॉरवर्ड करावे लागेल.
4 / 8
जर तुम्ही 16 व्या वर्षापासून 25 व्या वर्षापर्यंत दरमहा 5 हजार रुपयांचे (प्रतिदिन 167 रुपये) योगदान (कंट्रीब्युशन) चालू ठेवले तर 25 व्या वर्षाच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 41 लाखांची रक्कम मिळेल. हमी परताव्यासह या योजनेत, गुंतवणूकदारांना चक्रवाढीचा जबरदस्त लाभ मिळतो.
5 / 8
पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी चांगली योजना आहे. तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 5 हजार रुपये गुंतवले, तर यानुसार, तुम्ही वार्षिक 60,000 रुपये गुंतवले आहेत. 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये खाते वाढवल्यास, ते 25 वर्षांत मॅच्योर झाल्यानंतर तुम्हाला 41.23 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची 15 लाख रुपयांची गुंतवणूक असेल, तर 26.23 लाख रुपयांची संपत्ती वाढेल.
6 / 8
पीपीएफवर सध्या वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळत आहे. तुम्हाला 41 लाखांचा निधी तयार करणे सोपे जाईल. पीपीएफमध्ये चक्रवाढ वार्षिक आधारावर केली जाते. पीपीएफ खात्यात, सरकार दर तिमाही आधारावर व्याजदर बदलते. पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. परंतु खातेदार 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये मुदतवाढीसाठी अर्ज करू शकतात.
7 / 8
पीपीएफमध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ उपलब्ध आहेत. यामध्ये योजनेतील 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट घेता येते. पीपीएफमध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम देखील करमुक्त आहे.
8 / 8
अशा प्रकारे, पीपीएफमधील गुंतवणूक EEE श्रेणीत येते. पीपीएफ खात्यावर कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. पीपीएफ खाते ज्या वर्षात उघडले आहे, त्या वर्षाच्या अखेरीस एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कोणीही कर्जासाठी अर्ज करू शकतो.