Post Office Scheme: Invest in Post Office's Postal Life Insurance Scheme
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक, थोड्या गुंतवणुकीत मिळेल 50 लाखांपर्यंतचा फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 3:18 PM1 / 11 आजही देशातील एक मोठा वर्ग पोस्ट ऑफिस(Post Office) योजनांवर खूप विश्वास ठेवतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, ज्या प्रत्येक वयोगटासाठी बनविल्या गेल्यात. 2 / 11 भारतीय पोस्ट ऑफिसने अनेकदा नागरिकांसाठी अनेक फायदेशीर योजना आणल्या आहेत. पोस्ट ऑफीसच्या या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.3 / 11 या सर्व योजना सरकारी असल्यामुळे या योजनांमध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस होत नाही. तुम्हालाही जोखीम न घेता सुरक्षितपणे गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस स्कीममध्ये पैसे गुंतवू शकता.4 / 11 आज आम्ही तुम्हाला अशाच एका चांगल्या पोस्ट ऑफिस योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये पैसे गुंतवून खूप चांगला परतावा मिळू शकतो. 5 / 11 या योजनेचे नाव 'पोस्टल लाइफ इन्शुरन्स' (Postal Life Insurance) आहे. या योजनेद्वारे, गुंतवणूकदार 50 लाखांपर्यंतच्या कव्हरेजसह इतर अनेक फायदे मिळवू शकतो.6 / 11 पोस्ट ऑफिस लाइफ इन्शुरन्स अंतर्गत तुम्हाला दोन श्रेणींमध्ये पैसे गुंतवण्याचा पर्याय मिळतो. PLI आणि RPLI अशी त्याची नावे आहेत. PLI अंतर्गत तुम्हाला 6 पॉलिसी पर्याय मिळतात. 7 / 11 या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला किमान 2 लाख आणि कमाल 50 लाखांपर्यंत PLI Sum Assured चे कव्हर मिळते. यासोबतच, व्यक्तीला 80 वर्षांपर्यंत विम्याची रक्कम मिळण्याची सुविधा आहे. 8 / 11 पोस्टल लाइफ इन्शुरन्सचे फायदे- तुम्ही किमान 4 वर्षांसाठी पोस्टल लाइफ इन्शुरन्स घेऊ शकता, त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. या पॉलिसीसह तुम्हाला निश्चित रकमेची सुविधा मिळते. 9 / 11जर तुम्हाला पॉलिसी 3 वर्षांसाठी बंद करायची असेल, तर तुम्हाला पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा मिळते. यापूर्वी ही योजना फक्त सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी होती.10 / 11 पण आता नियमात बदल करुन डॉक्टर, इंजिनीअर, मॅनेजमेंट कन्सल्टंट, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, वकील, बँकर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.11 / 11 PLI होल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी, विमाधारकाचे वय किमान 19 वर्षे आणि कमाल 55 वर्षे असावे. ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट https://pli.indiapost.gov.in वर जाऊन पॉलिसी ऑनलाइन खरेदी करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications