शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय SBI ,HDFC आणि ICICI पेक्षाही अधिक व्याज, तुम्ही केलीये का गुंतवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 9:09 AM

1 / 7
गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी केवळ नुसती गुंतवणूक करणं पुरेसं नसतं, तर कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी हेही खूप महत्त्वाचं असतं. याशिवाय कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी ही गुंतवणूक सुरक्षित आहे की नाही याची खात्री करून घेणंही आवश्यक आहे.
2 / 7
अशीच एक स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट स्कीम, जी केवळ सुरक्षितच नाही तर देशातील अनेक मोठ्या बँकांपेक्षा आपल्या ग्राहकांना जास्त परतावा देत आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेत किती टक्के व्याज मिळतंय आणि कोणत्या बँका त्यापेक्षा जास्त परतावा देत आहेत.
3 / 7
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीमच्या व्याजदरात अर्थ मंत्रालयाकडून दर तिमाहीला सुधारणा केली जाते. याच अनुषंगाने अर्थ मंत्रालयानं जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी नवीन व्याजदरही जाहीर केले आहेत, जे १ जुलैपासून लागू होतील आणि ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहतील. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी केंद्र सरकारनं व्याजदर कायम ठेवले आहेत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेवर सध्या ७.७ टक्के व्याज मिळतं, जे अनेक बँकांपेक्षा जास्त आहे.
4 / 7
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. तर १० वर्षांवरील मुलांसाठी त्यांच्या नावानं पालक खाते उघडू शकतात. या योजनेत ५ वर्षांसाठी पैसे जमा केले जातात.
5 / 7
यामध्ये गुंतवणुकीची किमान रक्कम १००० रुपये आहे, तर १०० रुपयांच्या पटीत कितीही रक्कम जमा करता येते. म्हणजे जास्तीत जास्त रकमेची मर्यादा नसते. तसंच या योजनेअंतर्गत खातं उघडण्याची कोणतीही मर्यादा नाही. एनएससी ठेवीच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यावर मॅच्युअर होते.
6 / 7
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया पाच वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर सर्वसामान्यांना ६.६० टक्के परतावा देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५० टक्के व्याज दर देत आहे. एचडीएफसी बँक पाच वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५० टक्के परतावा देत आहे.
7 / 7
आयसीआयसीआय बँक सामान्य नागरिकांसाठी ५ वर्षांसाठी ६.९० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.४० टक्के व्याज देत आहे. अॅक्सिस बँक पाच वर्षांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५० टक्के व्याज दर देत आहे.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकPost Officeपोस्ट ऑफिसSBIएसबीआयICICI Bankआयसीआयसीआय बँक