शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त आहे Post Office ची ही स्कीम, हप्त्यांत पैसे भरा; पाहता पाहता जमा होतील १२ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 9:30 AM

1 / 7
Post Office Investment Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये बँकांप्रमाणेच सर्व बचत योजना चालवल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी (Post Office RD). ही योजना पिगी बँकसारखी आहे, ज्यामध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. मुदतपूर्तीनंतर ही रक्कम व्याजासह दिली जाते. पोस्ट ऑफिसच्या आरडीचा कालावधी ५ वर्षांचा असतो. सध्या या आरडीवर ६.७ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे.
2 / 7
व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते. आपण जितकी चांगली रक्कम जमा कराल तितकी मोठी रक्कम आपण व्याजाद्वारे जोडू शकता. तुम्हाला हवं असल्यास पोस्ट ऑफिस आरडीच्या माध्यमातून १२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. पण यासाठी तुम्हाला दरमहा ७ हजार रुपयांची आरडी सुरू करावी लागेल. पाहूया कसे जमवता येतील तुम्हाला १२ लाख रुपये.
3 / 7
जर तुम्ही या योजनेत दरमहा ७ हजार रुपयांची गुंतवणूक केली तर ५ वर्षात पोस्ट ऑफिस आरडीमध्ये एकूण ४,२०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये तुम्हाला ६.७ टक्के दरानं व्याज दिलं जाणार आहे.
4 / 7
अशातच या व्याजदरानुसार तुम्हाला ५ वर्षात फक्त व्याज म्हणून ७९,५६९ रुपये मिळतील. यामध्ये तुमची गुंतवलेली रक्कम आणि व्याज जोडल्यास तुमच्या मॅच्युरिटीच्या वेळी एकूण ४,९९,५६४ रुपये म्हणजेच जवळपास ५ लाख रुपये मिळतील.
5 / 7
पण मॅच्युरिटीपूर्वी तुम्हाला पुढील ५ वर्षे आरडी वाढवावी लागेल, म्हणजेच आरडी १० वर्षे चालवावी लागेल. सलग १० वर्षे गुंतवणूक केल्यानंतर तुमची एकूण गुंतवणूक ८,४०,००० रुपये होईल. ६.७ टक्के दराने केवळ व्याजापोटी ३,५५,९८२ रुपये मिळतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ११,९५,९८२ रुपये म्हणजेच सुमारे १२ लाख रुपये मिळतील.
6 / 7
पोस्ट ऑफिसआरडीच्या मुदतवाढीसाठी तुम्हाला संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल. मुदतवाढीनंतर खात्यावर त्याच दरानं व्याज दिलं जाईल ज्यावर खातं उघडलं गेलं होतं. या कालावधीत मुदत वाढ केलेलं खातं केव्हाही बंद केलं जाऊ शकते. पूर्ण वर्षांसाठी तुम्हाला आरडीच्या व्याजदराचा लाभ मिळेल, एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पोस्ट ऑफिस बचत खात्याचा व्याजदर लागू होईल.
7 / 7
उदाहरणार्थ, जर तुम्ही ३ वर्ष ६ महिन्यांनंतर ५ वर्षांसाठी वाढवलेल्या खात्यातून पैसे काढले तर त्याच्या पूर्ण तीन वर्षांसाठी तुम्हाला ६.७% व्याज मिळेल, परंतु 6 महिन्यांसाठी पोस्ट ऑफिस बचत खात्याचं ४% दरानं व्याज दिलं जाईल. पण जर तुम्हाला पोस्ट ऑफिसआरडीमधून १२ लाख रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला पूर्ण ५ वर्षांच्या वाढीव कालावधीसाठी ७ हजार रुपये गुंतवावे लागतील.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक