post office scheme which not offer 80c income tax benefits
करबचतीसाठी गुंतवणूक करताय? Post Office च्या 'या' योजनांवर मिळत नाही 80C चा लाभ! By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 3:32 PM1 / 6कर वाचवण्यासाठी पोस्ट ऑफिस बचत योजना खूप लोकप्रिय आहेत. बऱ्याच लहान बचत योजना आयकराच्या कलम 80C चा लाभ देतात. मात्र, पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामुळे कर वाचवण्याचा लाभ गुंतवणूकदारांना दिला जात नाही. अशा परिस्थितीत करबचतीसाठी गुंतवणूक करण्याआधी या योजनांची माहिती घ्यावी. ज्यावर कलम 80C चा लाभ मिळत नाही.2 / 6ही पोस्ट ऑफिस योजना आहे, ज्यामध्ये कलम 80C चा लाभ दिला जात नाही. यातून मिळणाऱ्या रिटर्नवर कर भरावा लागतो. या योजनेतून मिळणारे उत्पन्न आयटीआरमधील 'इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात' गणले जाते.3 / 6पाच वर्षांच्या आरडीमध्ये 80C आधारावर प्राप्तिकराचा लाभ मिळत नाही. यामध्ये प्राप्त झालेल्या संपूर्ण रिटर्नवर कर भरावा लागतो.4 / 6तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एक, दोन, तीन आणि पाच वर्षांसाठी टाइम डिपॉझिट करू शकता. पण, आयकर सवलती केवळ पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिटवरच मिळतात. इतर एक, दोन आणि तीन वर्षांच्या डिपॉझिटवर कर सूट मिळत नाही.5 / 6या योजनेतही गुंतवणूकदारांना आयकराचा लाभ मिळत नाही. या योजनेत 9 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. मिळालेले व्याज मर्यादेपेक्षा जास्त असल्यास डीटीएस कापला जातो.6 / 6या योजनेची घोषणा मोदी सरकारने अर्थसंकल्प 2023 मध्ये केली होती. या योजनेवर कोणताही कर लाभ नाही. या योजनेत तुम्हाला व्याजाच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागतो. आणखी वाचा Subscribe to Notifications