This Post Office scheme will give you regular income You can start with only 1000 rupees
Post Office ची ही स्कीम देईल तुम्हाला रेग्युलर इन्कम; केवळ १००० रूपयांत करू शकता सुरूवात By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 1:40 PM1 / 12सरकारनं सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सलग दुसऱ्या तिमाहिमध्ये छोट्या बचत योजनांच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा आदेश ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.2 / 12अशा परिस्थितीत जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर Post Office ची एक अशी स्कीम आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळते. 3 / 12या योजनेतून मिळणारा लाभ किती असेल, किती असेल व्याजदर आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या नावे स्कीम सुरू करू शकता का?, जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या मंथली इन्कम स्कीमशी (Post Office Monthly Income Scheme) निगडीत प्रत्येक प्रश्नांची उत्तरं.4 / 12तुम्हाला किमान १००० रूपयांची गुंतवणूक करून या स्कीमची सुरूवात करता येऊ शकते. एखादी व्यक्ती यामध्ये जास्तीतजास्त साडेचार लाख रूपयांची गुंतवणूक करू शकेल. 5 / 12परंतु या स्कीममध्ये जर तुम्ही जॉईंट खातं सुरू केलं तर तुम्ही यामध्ये ९ लाखांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. 6 / 12जेव्हा कोणतीही व्यक्ती स्कीममध्ये पैसे गुंतवण्याची तयारी करत असते, त्यावेळी सर्वप्रथम ती व्यक्ती यावर जेव्हा कोणतीही व्यक्ती स्कीममध्ये पैसे गुंतवण्याची तयारी करत असते, त्यावेळी सर्वप्रथम ती व्यक्ती यावर व्याज किती मिळेल, याची माहिती तपासत असते. व्याज किती मिळेल, याची माहिती तपासत असते. 7 / 12पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये ग्राहकांना ६.६ टक्क्यांचं व्याज देण्यात येतं. जर तुम्ही दर महिन्याला मिळणारं व्याज काढलं नाही, तर तुम्हाला त्या व्याजावर अतिरिक्त व्याज मिळणार नाही.8 / 12यामध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. या स्कीममध्ये गुंतवणूक करताना यामधून व्याजाद्वारे होणारी कमाई ही कराच्या कक्षेत येते.9 / 12ही स्कीम पाच वर्षांसाठी सुरू केली जाते. परंतु काही अटींसह ही स्कीम एका वर्षातही बंद करता येऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीनं ही स्कीम एका वर्षानंतर आणि ३ वर्षांच्यापूर्वी बंद केली तर त्या व्यक्तीला प्रिन्सिपल अमाऊंटमधून २ टक्के रक्कम कापून दिली जाते. 10 / 12जर एखाद्या व्यक्तीनं तीन वर्ष ते पाच वर्षांच्या दरम्यान आपला अकाऊंट बंद केला, तर त्या व्यक्तीला प्रिन्सिपल अमाऊंटमधून एक टक्का रक्कम कापून दिली जाते.11 / 12परंतु जर ही स्कीम घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत त्यांच्या नॉमिनीला पैसे दिले जातात. यासाठी आपलं खातं सुरू करताना नॉमिनी लिहिणं आवश्यक आहे. 12 / 12दरम्यान, खातं उघडताना काही अटींचं पालन करावं लागेल. संबंधित व्यक्ती भारताची नागरिक असणं आवश्यक आहे. तसंच कोणतीही परदेशातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. याशिवाय त्या व्यक्तीचं वय १० वर्षांपेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications