PPF account can make you a millionaire Just have to fit 'this' math
PPF खाते तुम्हाला करोडपती करु शकते! फक्त 'हे' गणित बसवावे लागेल By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 7:34 PM1 / 9पब्लिक प्रोव्हीडंट फंड हा एक गुंतवणुकीचा चांगला माध्यम आहे. याद्वारे अनेकजण गुंतवणूक, बचत आणि आयकर वाचवू शकतात.2 / 9यात तुम्हाला पीपीएफ खात्याद्वारे निश्चित व्याज देखील मिळते आणि या खात्यासाठी अनेक अटी आहेत. तुम्ही या पीपीएफ खात्याद्वारे करोडपती देखील बनू शकतात. पण, गुंतवणूक करताना तुम्हाला काही गणिते लक्षात ठेवणे गरजेचे आहे.3 / 9पीपीएफ योजनेवर व्याज मिळते आणि सध्या या योजनेवर ७.१ टक्के दराने व्याज दिले जात आहे.4 / 9यासोबतच या खात्यातील मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा आहे. जर तुम्हाला हवे असेल तर ते १५ वर्षांनी मॅच्युरिटी रक्कम काढू शकतात किंवा त्यांचे पीपीएफ खाते ५ वर्षांसाठी वाढवू शकतात.5 / 9एका आर्थिक वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकतात. याशिवाय किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करता येईल.6 / 9पीपीएफ खात्यात नियमित गुंतवणूक केल्यास पीपीएफ खात्यातून तुम्ही करोडपती होऊ शकता.7 / 9तुम्ही PPF खात्याद्वारे करोडपती होण्याचे लक्ष्य ठेवत असल्यास, तुम्ही हे लक्षात ठेवा की, तुम्ही एका आर्थिक वर्षात या योजनेत १.५ लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. फक्त कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.8 / 9जर एखाद्या व्यक्तीने ७.१ टक्के व्याजाने २५ वर्षे सतत १.५ लाख रुपये गुंतवले तर ३७.५ लाख रुपये खातेधारकाद्वारे २५ वर्षांसाठी त्यात जमा केले जातील. 9 / 9या पैशावर ६५,५८,०१५ रुपये व्याज मिळेल. जेव्हा या दोन रकमा जोडल्या जातात, तेव्हा २५ वर्षांच्या परिपक्वतेवर १,०३,०८,०१५ रुपये मिळतील. या पद्धतीने तर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications