ppf account for minor child to get 32 lakhs at maturity after 15 year
३ वर्षांच्या मुलाच्या नावे PPF खातं उघडा; १५ वर्षांनंतर मिळवा ३२ लाख रुपये! By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 10:00 AM1 / 9आपल्या मुलाचं आयुष्य सुखकर व्हावं, शिक्षण चांगलं व्हावं आणि पुढे जाऊन आपल्या मुलांचं लग्नाचं टेन्शन नको अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. आपल्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्यासाठी गुंतवणूक करणं महत्वाचं ठरतं. 2 / 9आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी चांगली योजना निवडताना कमीत कमी गुंतवणुकीत दीर्घकालीन कालावधीसाठी मोठा परतावा कोणती योजना देते याचा विचार करायला हवा. यासाठी तुम्हाला पब्लिक प्रोविडंट फंड (PPF) मदत करू शकतं. 3 / 9आपल्या लहान बाळाच्या नावानं पीपीएफ खातं उघडाव लागेल आणि यात एक ठराविक रक्कम जमा करावी लागेल. दर महिन्याला रक्कम भरण्याची सवय लावली तर तुमचं मुल प्रौढ झाल्यानंतर एक मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते. 4 / 9पीपीएफ खातं उघडण्यासाठी तुमच्या पत्त्याचा पुरावा देण्यासाठी अधिकृत पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, आधार, रेशन कार्ड सादर करु शकता. ओळखपत्रासाठी पॅनकार्ड, आधार, मतदान कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. त्यासोबत आपल्या लहान बाळाचा जन्म दाखला देणं आवश्यक असणार आहे. त्यासोबत बाळाचा एक पासपोर्ट साइज फोटोग्राफ लागेल. 5 / 9खातं उघडताना कमीत कमी ५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा चेक द्यावा लागेल. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तुमच्या बाळाच्या नावावर पीपीएफ पासबुक जारी केलं जाईल. 6 / 9लहान मुलाच्या नावावर पीपीएफ खातं सुरू केल्यानंतर ३२ लाख रुपये कसे मिळवाल हे जाऊन घेऊयात. समजा तुमच्या मुलाचं वय ३ वर्ष आहे आणि तुम्ही त्याच्या नावे पीपीएफ खातं सुरू केलं. त्यानंतर जेव्हा तुमचं मुल १८ वर्षांचं होईल तेव्हा पीपीएफ खातं मॅच्युअर होईल. हवं असेल तर त्यानंतर ती पुन्हा वाढवता येऊ शकते. 7 / 9आता आपण १५ वर्षांसाठीचा हिशोब घेतला आणि तुम्ही दरमहा आपल्या मुलाच्या नावावर १० हजार रुपये जमा करत असाल तर मोठी रक्कम तुम्हाला १५ वर्षांनी मिळू शकेल. पीपीएफवरील ७.१० टक्क्यांच्या व्याजाच्या हिशोबानं परतावा पाहायचा झाल्यास मॅच्युअरिटीनंतर तुमच्या मुलाला ३२ लाख १६ हजार २४१ रुपये मिळू शकतात. अर्थात ही राशी तुमचं मूल १८ वर्षांचं झाल्यानंतरच मिळू शकेल. 8 / 9मुलाचं १८ वर्ष वय म्हटलं तर तुम्हाला मिळणारी राशी त्याच्या पुढील उच्च शिक्षणासाठी नक्कीच खूप मदतीची ठरू शकेल. पीपीएफ खात्याची एक महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी वयाची कोणतीही अट नसते. तुमच्या मर्जीनुसार तुम्ही हवं त्या वयात खातं उघडू शकता आणि गुंतवणुकीस सुरुवात करु शकता. 9 / 9यासाठी तुम्हाला फक्त बँकेत जाऊन फॉर्म-१ भरावा लागेल. तुमच्या घराच्या जवळच्या कोणत्याही अधिकृत बँकेत जाऊन तुम्ही पीपीएफ खातं उघडू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications