ppf account will be inactive if fail to make minimum deposit
नव्या वर्षात 'ही' चूक करु नका, नाहीतर तुमचे PPF खाते बंद होऊ शकत By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 1:39 PM1 / 9केंद्र सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते, या योजनेत पीपीएफ योजनेचा समावेश आहे. या योजनेतून सर्वसामान्यांना फायदा होतो. पब्लिक प्रोव्हीडंट फंड म्हणजेच पीपीएफ मध्ये जास्त काळासाठी गुंतवणूक करु शकतो. 2 / 9पब्लिक प्रॉव्हिडंट फंड 1968 मध्ये भारतात लहान बचत गुंतवणुकीच्या रूपात एकत्रित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आणि त्यावर परतावा मिळावा. 3 / 9याला बचत-सह-कर बचत गुंतवणूक योजना असेही म्हटले जाते. या योजनेवर बचतीसोबतच कर लाभही मिळतो.4 / 9टॅक्स वाचवून आणि रिटर्न चांगल्या कमाइसाठी सुरक्षित ठेवीचा विचार करणाऱ्यांना पीपीएफ खाते उघडणे फायद्याचे ठरणार आहे. पीपीएफ खाते वयस्कर आणि तरुणही चालू करु शकतात.5 / 9PPF खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. तुम्ही एका आर्थिक वर्षात PPF खात्यात 500 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता.6 / 9पैसे एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये जमा केले जाऊ शकतात. पीपीएफ खात्यात अशी सुविधा देखील दिली जाते. आर्थिक वर्षात किती हप्ते किती आहेत, यावर कोणतेही बंधन नाही.7 / 9एका आर्थिक वर्षात गुंतवायची रक्कम 1.5 लाख रुपयांपर्यंत असावी. याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या कालावधीत जमा केलेल्या पैशावर 80C अंतर्गत कर लाभ देखील उपलब्ध आहेत.8 / 9पीपीएफ खाते उघडल्यानंतर, खाते सक्रिय ठेवायचे असेल, तर प्रत्येक आर्थिक वर्षात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही आर्थिक वर्षात PPF खात्यात किमान 500 रुपये जमा न केल्यास खाते निष्क्रिय होईल. त्याच वेळी, पीपीएफमध्ये वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे.9 / 9जर खाते निष्क्रिय झाले तर त्याचा पीपीएफ खात्यात जमा केलेल्या पैशावर मिळणाऱ्या व्याजावरही परिणाम होऊ शकतो. नवीन वर्षात, तुमचे पीपीएफ खाते कधीही निष्क्रिय होऊ देऊ नका आणि त्यात किमान शिल्लक ठेवा. आणखी वाचा Subscribe to Notifications