शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

12,500 रुपयांवरुन 40 लाख कसे बनवायचे? 'ही' ट्रीक वापरुन व्हा श्रीमंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 4:01 PM

1 / 7
सध्याचे दिवस हे महागाई आहेत. अनेकांचे महिन्याचे बजेट कोसळले आहे. पण, तरीही अनेकजण बचत करतात. पैशांचे व्यवस्थित व्यवस्थापन करुन बचत केली तर आपण श्रीमंत होऊ शकतो. गुंतवणुकीची सवय लावली तर भविष्यात खूप फायदा होतो. भविष्यात लोकांना त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने गुंतवणूक केली जाते. तुम्ही जर दीर्घकाळ गुंतवणूक केली तर चांगला फंडही तयार होऊ शकतो.
2 / 7
आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीची अशी एक पद्धत सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांचा फंड कोणताही धोका न घेता तयार केला जाऊ शकतो.
3 / 7
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही योजना सरकार चालवत आहे. PPF द्वारे एका वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. जमा केलेल्या रकमेवर चांगले व्याज देखील दिले जाते.
4 / 7
पीपीएफमध्ये गुंतवणुकीत कोणताही धोका नाही, या फंडातून व्याजाद्वारे लाखोंची गुंतवणूक केली जाऊ शकते. पीपीएफच्या माध्यमातून 40 लाख रुपयांचा निधी तयार करायचा असेल तर ही पद्धत अवलंबून पैसै वाचवू शकता.
5 / 7
पीपीएफमध्ये एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. पीपीएफ खात्यात दर महिन्याला 12,500 रुपये जमा केले, तर वर्षाला 1.5 रुपये गुंतवले जाऊ शकतात. आता 15 वर्षांसाठी अशा प्रकारे गुंतवणूक केली तर 15 वर्षात 22.50 लाख रुपये पीपीएफमध्ये जमा होतील.
6 / 7
सध्या PPF खात्यात जमा केलेल्या रकमेच्या आधारे या रकमेवर 7.1 टक्के व्याज देखील दिले जाते. जर 12,500 रुपये दरमहा किंवा 1.5 लाख रुपये प्रति वर्ष 15 वर्षांसाठी जमा केले आणि 7.1 टक्के व्याज मिळाले, तर 15 वर्षांत 18,18,209 रुपये व्याज मिळते.
7 / 7
PPF खात्यात 15 वर्षात जमा केलेली रक्कम 22.50 लाख रुपये आहे आणि त्यात 18,18,209 रुपये व्याजाची रक्कम जोडली जाते, तर PPF खात्यात 40,68,209 रुपयांचा निधी सहज तयार होतो.
टॅग्स :Investmentगुंतवणूक