शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PPF : दरमहा २०००, ३०००, ४००० आणि ५००० रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 9:41 AM

1 / 8
जर तुम्ही गुंतवणुकीसाठी अशी स्कीम शोधत असाल, ज्यामध्ये कोणतीही जोखीम नसेल आणि नफाही चांगला असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक चांगला पर्याय असू शकतो.
2 / 8
कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. पीपीएफमध्ये दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आणि किमान 500 रुपये जमा करता येतात.
3 / 8
ही स्कीम 15 वर्षांसाठी असून यात चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के दरानं व्याज मिळत आहे.
4 / 8
जर तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करायची असेल, पाहूया दरमहा 2000, 3000, 4000 आणि 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल?
5 / 8
पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 2000 रुपये गुंतवल्यास, तुमची एका वर्षात 24,000 रुपयांची गुंतवणूक असेल. अशा प्रकारे, 15 वर्षांत तुम्ही एकूण 3,60,000 रुपये गुंतवाल. परंतु 7.1 टक्के चक्रवाढ व्याजानुसार 2,90,913 रुपये मिळतील. अशाप्रकारे मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 6,50,913 रुपये मिळतील.
6 / 8
तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 3000 रुपये जमा केल्यास, तुम्ही एका वर्षात एकूण 36000 रुपये गुंतवाल. 5,40,000 रुपये 15 वर्षांत जमा केले जातील आणि 4,36,370 रुपये त्यावर व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे, जेव्हा तुमची स्कीम 15 वर्षांनी मॅच्युअर होईल, तेव्हा तुम्हाला 9,76,370 रुपये मिळतील.
7 / 8
दुसरीकडे, तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 4000 रुपये गुंतवल्यास तुमची वार्षिक गुंतवणूक 48000 रुपये होईल. अशा प्रकारे 15 वर्षांत तुम्ही एकूण 7,20,000 रुपये गुंतवाल. तुम्हाला 7.1 टक्के व्याजदरानुसार केलेल्या गुंतवणुकीवर व्याज म्हणून 5,81,827 रुपये मिळतील. त्याच वेळी तुमची मॅच्युरिटीची रक्कम 13,01,827 रुपये असेल.
8 / 8
तुम्ही पीपीएफमध्ये दर महिन्याला 5000 रुपये जमा केल्यास एका वर्षात एकूण 60,000 रुपये जमा होतील आणि 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 9 लाख रुपये होईल. यावरील व्याजाबद्दल बोलायचं झाल्यास सध्याच्या व्याजदरानुसार 7,27,284 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला या योजनेद्वारे मॅच्युरिटीवर 16,27,284 रुपये मिळतील.
टॅग्स :PPFपीपीएफInvestmentगुंतवणूक