PPF Sukanya Samriddhi KYC complete this work by 31st March otherwise there will be huge loss
PPF, सुकन्या समृद्धी, KYC... ३१ मार्च पर्यंत पूर्ण करा 'ही' कामं, अन्यथा होईल मोठं नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 9:03 AM1 / 831 March Deadline : आर्थिक वर्ष २०२४ संपायला आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अनेक आर्थिक कामांची डेडलाईन ही ३१ मार्च रोजी संपणार आहे. या उरलेल्या दिवसांत ही महत्त्वाची कामं न केल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेसारख्या बचत योजनांमध्ये किमान रक्कम न भरल्यास तुमचं खातं डीफॉल्ट श्रेणीमध्ये येईल. ३१ मार्च रोजी कोणत्या योजनांची मुदत संपत आहे ते जाणून घेऊया.2 / 8होमलोनवर सूट - स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे (SBI) होमलोनसाठी चालवल्या जाणाऱ्या विशेष योजनेअंतर्गत, तुम्ही ३१ मार्च २०२४ पूर्वी सवलत मिळवू शकता. या सवलतीमध्ये अनिवासी भारतीयांसाठी गृहकर्ज, फ्लेक्स-पे आणि अन्य होमलोन्सचा समावेश आहे. ज्यांचा CIBIL स्कोर चांगला आहे त्यांना SBI सवलतीच्या दरात होमलोन देत आहे.3 / 8एसबीआय अमृत कलश - SBI अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, ४०० दिवसांच्या विशेष कालावधीची ही योजना १२ एप्रिल २०२३ पासून ७.१०% व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६०% व्याजदर दिला जात आहे.4 / 8किमान गुंतवणूकीची अंतिम मुदत - पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेसारख्या सरकारी योगदान बचत योजनांमध्ये, एका वर्षात अनुक्रमे ५०० रुपये आणि २५० रुपये किमान रक्कम ठेवावी लागते. ही किमान रक्कम, कोणत्याही आर्थिक वर्षात जमा केली नाही तर तुमचे खातं डीफॉल्ट श्रेणीत येईल. तुम्हाला कर सवलतीचा फारसा फायदा मिळणार नाही. हे काम ३१ मार्च २०२४ पूर्वी पूर्ण करणं आवश्यक आहे.5 / 8Fastag - फास्टॅग केवायसी अद्याप पूर्ण केली नसल्यास, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) त्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. ३१ मार्चपर्यंत केवायसी न केल्यास फास्टॅगला ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाऊ शकतो. NHAI द्वारे जारी केलेल्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करण्यासाठी, www.fastag ला भेट देऊन तुम्ही केवायसी पूर्ण करू शकता. जर फास्टॅग बँकेनं जारी केला असेल तर तुम्ही बँकेच्या वेबसाइटवर जाऊन केवायसी पूर्ण करू शकता. अनेक बँका व्हीडीओ केवायसीची सेवाही पुरवत आहेत.6 / 8IDBI विशेष एफडी - IDBI बँक ७.०५%, ७.१०% आणि ७.२५% व्याजदरानं अनुक्रमे ३०० दिवस, ३७५ दिवस आणि ४४४ दिवसांच्या विशेष कालावधीत उत्सव उत्सव कॉलेबल एफडी ऑफर करत आहे. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर हे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करा.7 / 8नॉमिनी अपडेट करणं - हा नो युअर कस्टमर म्हणजेच KYC चा एक भाग आहे. तुम्ही तुमची बँक खाती, शेअर्स, पीपीएफ खातं आणि इतरत्र नॉमिनी अपडेट केलं नसेल तर ३१ मार्चपूर्वी करा. याशिवाय, सेबीनं डिमॅट खात्यातील नॉमिनी अपडेटची तारीख वाढवली आहे. आता हे काम ३० जून २०२४ पर्यंत पूर्ण केलं जाऊ शकतं.8 / 8EV वर सब्सिडी - FAME-II अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी ३१ मार्च २०२४ नंतर उपलब्ध होणार नाही. त्यात वाढ करण्याचा निर्णय सरकारनं सध्या घेतलेला नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखादे ईव्ही वाहन घ्यायचे असेल तर ते ३१ मार्चपूर्वी खरेदी करा. सध्या देशात ईव्हीचा ट्रेंड वाढत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications