शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Price Hike: महागाई! गारमेंट, फ्रीज-टीव्हीसह कॉस्मेटिकची मोठी दरवाढ होण्याची शक्यता; कंपन्या संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 1:04 PM

1 / 8
येत्या काळात गारमेंट, इलेक्ट्रॉनिक्स, दारु आणि कॉस्मेटिकच्या किंमती आठ ते दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. कंपन्यांनी कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढल्याचे कारण दिले आहे. भाव वाढल्याने या उत्पादनांच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
2 / 8
कच्च्या मालाबरोबरच सप्लाय चेनच्या खर्चातही वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने माल वाहतूक वाढली आहे. अन्न धान्यापासून पर्सनल केअर पॅकेज्ड फूड आणि डायनिंग सर्व्हिसेज देणाऱ्या कंपन्यांनी आधीच किंमती वाढविल्या आहेत.
3 / 8
नवीन वर्षाच्या सुरुवातीला आता या गारमेंट, इलेक्ट्रॉनिक्स, दारु आणि कॉस्मेटिकच्या कंपन्यादेखील दर वाढ करण्याचा विचार करू शकतात. ही दरवाढ अशावेळी होत आहे, जेव्हा या उत्पादनांच्या विक्रीन कोरोना संकटाच्या आधीचे विक्रीचे रेकॉर्ड तोडले आहेत.
4 / 8
दसरा, दिवाळी, छट पूजा आदी सणांमुळे भारतात उत्पादने आणि सेवांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही मागणी पुढील काही दिवस म्हणजेच ख्रिसमसपर्यंत अशीच राहण्याची आशा आहे.
5 / 8
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर आशीष दीक्षित यांनी विश्लेषकांना सांगितले की, जेव्हा ऑर्गॅनिक आणि मटेरियलद्वारे महागाई तुमच्यावर परिणाम करते तेव्हा कंपन्यांकडे किंमत वाढविण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही.
6 / 8
उद्योगांना वाढत्या खर्चाचे संकेत हे होलसेल महागाई दर्शविते. गेल्या सहा महिन्यांपासून ही महागाई 2 आकडी झाली आहे. गेल्या काही महिन्यांत घाऊक महागाईचा दर कमी झाला आहे. परंतू ठोक महागाईच्या दरात वाढ झाल्याने कंपन्यांचा खर्च वाढला आहे.
7 / 8
लाईफस्टाईल इंटरनॅशनलचे सीईओ देव रंजन नायर यांनी एनबीटीला सांगितले की, कच्च्या मालाच्या दरात ज्या प्रकारे वाढ होत आहे, ते आधी कधीही झाले नव्हते. दर महिन्याला हे दर वाढत चालले आहेत. यामुळे उत्पादने वाढविणाऱ्या कंपन्यांनादेखील किंमत वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
8 / 8
कंपन्यांनी काही काळ हा वाढलेला खर्च स्वत: उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, नफा-तोटा याचे संतुलन ठेवण्यासाठी आता किंमती वाढविणे गरजेचे बनले आहे. इंधन आणि माल वाहतुकीचे भाडे वाढल्यामुळे कंपन्या किंमत वाढविण्याचे पाऊल उचलणार आहेत.
टॅग्स :InflationमहागाईFuel Hikeइंधन दरवाढ