शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar Card वरचा फोटो आवडला नाही? बदलण्यासाठी ही आहे सर्वात सोपी पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 10:43 AM

1 / 14
अनेकदा आपण आधार कार्डावर फोटो चांगला आला नाही, अशा तक्रारी करत असतो. आता तो फोटो बदलण्याचा पर्यायही तुमच्या जवळ उपलब्ध आहे.
2 / 14
UIDAI यापूर्वी आधार क्रमांकावर नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक बदलण्यासोबत फोटोग्राफही ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा मिळत होती.
3 / 14
परंतु काही दिवसांपूर्वी UIDAI नं घसबसल्या पत्ता बदलण्याची देण्यात आलेली सेवा बंद केली होती. तसंच पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं आधारनं सांगितलं होतं.
4 / 14
त्यामुळे आता नाव, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख, ईमेल अॅड्रेस, पत्ता आणि फोटो बदलण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन प्रक्रियेचाच वापर करावा लागणार आहे.
5 / 14
जर तुम्हाला आधार कार्डावरील तुमचा फोटो बदलायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या आधार केद्रात जाऊन त्यासाठी फॉर्म भरून द्यावा लागेल.
6 / 14
यासाठी तुम्हाला आधार कार्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
7 / 14
त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Get Aadhaar सेक्शनमधून आधार नामांकन/अपडेट फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
8 / 14
हा फॉर्म योग्यरित्या भरून तो आधार केंद्रात न्यावा लागेल. त्यानंतर आधार केंद्रात तुमच्या फिंगरप्रिन्ट्स, रॅटिना स्कॅन आणि फोटोग्राफ पुन्हा कॅप्चर केले जातील.
9 / 14
नवं आधार कार्ड तयार करायचं असल्यास त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. परंतु आधार कार्डावर माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रूपये शुल्कही जमा करावं लागेल.
10 / 14
या क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन ट्रॅक करू शकता. यानंतर अपडेटेड फोटोसह तुम्हाला आधार कार्ड मिळण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागेल.
11 / 14
जर तुम्हाला आधार कार्डाच्या सेवा केंद्रात जायचं नसेल तर UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाला पत्र लिहूनही तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता.
12 / 14
यासाठी तुम्हाला UIDAI च्या पोर्टलवर जाऊन ‘Aadhaar Card Update Correction’ फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. त्यात विचारलेल्या सर्व गोष्टीही भराव्या लागतील.
13 / 14
या नंतर UIDAI च्या कार्यालयाच्या नावे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहावं लागेल. त्यानंतर आपला सेल्फ अटेस्टेड फोटो सही करून अटॅच करा.
14 / 14
फॉर्म आणि पत्र दोन्ही UIDAI च्या कार्यालयात पोस्टाद्वारे पाठवा. दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला तुमचं नवं आधारकार्ड प्राप्त होईल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डonlineऑनलाइनIndiaभारत