शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EPF मध्ये होणार 66 टक्के वाढ! आता करोडपती बनून व्हाल रिटायर, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 3:28 PM

1 / 6
सध्या नव्या वेतनश्रेणीच्या नियमांसंदर्भात (The New Wage Code) चर्चा सुरू आहे. माध्यमांमध्येही यासंदर्भात बरेच लिखान आणि चर्चा होताना दिसते. मात्र, केंद्र सरकारकडून यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची औपचारीक घोषणा झालेली नाही. पण, सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, नवा व्हेज कोड लागू झाल्यानंतर, खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2 / 6
नव्या व्हेज कोडने मिळणार दिलासा - नव्हा व्हेज कोडनुसार, कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी त्याच्या CTCच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी नसेल. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या EPF (Employees Provident Fund) वरही होईल. कर्मचारी आणि कंपनी दर मिहिन्याला बेसिक सॅलरीच्या 12-12 टक्के योगदान PF मध्ये देतील.
3 / 6
काय सांगतो EPFOचा नियम - EPFOच्या नियमांनुसार, तुम्ही पीएफची पूर्ण रक्कम काढली तर त्यावर कर आकारला जात नाही. म्हणून, नवीन वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर, जेव्हा बेसिक सॅलरी 50% पेक्षा अधिक असेल आणि त्यावर पीएफ योगदान कापले जाईल, तेव्हा पीएफ निधीदेखील अधिक असेल. म्हणजेच कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याच्याकडे पूर्वीच्या तुलनेत अधिक पीएफ शिल्लक असेल.
4 / 6
उदाहरणार्थ, आपले वय सध्या 35 वर्ष एवढे आहे आणि आपली सॅलरी 60,000 रुपये महिना आहे. या दरम्यान आपले वर्षाला 10 टक्के इंक्रिमेंट झाले, तरी सध्याचा PF व्याज दराचा(8.5) विचार करता, रिटायरमेंटच्या वयापर्यंत म्हणजेच 25 वर्षांनंतर आपला एकूण PF बॅलेन्स 1,16,23,849 रुपये एवढा असेल.
5 / 6
करोडपती बनून व्हाल रिटायर - याच बरोबर, सध्याच्या EPF योगदानाशी PF बॅलेंसची तुलना केल्यास, सेवानिवृत्तीनंतर PF बॅलेंस 69,74,309 रुपये एवढा होतो. अर्थात नव्या व्हेज रूलनुसार, पीएफ बॅलेंस जुन्या निधीच्या तुलनेत किमान 66 टक्के अधिक असेल. म्हणजेच नवा व्हेज कोड लागू झाल्यास आपण करोडपती म्हणून निवृत्त व्हाल.
6 / 6
ग्रेच्युटीमध्येही होणार मोठा बदल... - नव्या व्हेज कोडनुसार, कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्येही मोठा बदल होईल. ग्रेच्युटीचे कॅलक्युलेशन आता मोठ्या बेसवर होईल. यात बेसिक पे बरोबरच इतर भत्ते जसे, ट्रॅव्हल, स्पेशल अलाउंस आदिंचाही समावेश असेल. हे सर्व कंपनीच्या ग्रॅच्युटी खात्यात जोडले जाईल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारीGovernmentसरकार