शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Thermax Limited share: पुण्याच्या या कंपनीला मिळाली ५२२ कोटींची ऑर्डर; वृत्त समजताच शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 8:49 PM

1 / 6
Thermax Limited share: थरमॅक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त वाढ दिसून आली. कंपनीचा शेअर 14.33 टक्क्यांनी वाढून 2,282.55 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, थरमॅक्स कंपनीनं एका डीलबद्दल वृत्त दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.
2 / 6
राजस्थानमधील ग्राउंड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी युटिलिटी बॉयलर आणि संबंधित सिस्टमसाठी ५२२ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली. या वृत्तानंतर आज कंपनीच्या शेअर्सच्या खरेदीदारांमध्ये वाढ झाली.
3 / 6
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑर्डरमध्ये 260 TPH हाय प्रेशर युटिलिटी बॉयलरच्या दोन युनिट्सचा समावेश आहे. सोबतच थरमॅक्सच्या पूर्ण मालकीची कंपनी थरमॅक्स बॅबकॉक्स अँड विलकॉक्स एनर्जी सोल्युशन्स (TBWES) द्वारे ते डिझाइन आणि उत्पादित केले जातात.
4 / 6
'आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे सुरक्षित केलेल्या या ऑर्डरसह नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पुरवठ्याच्या व्याप्तीमध्ये प्रकल्प व्यवस्थापन, अभियांत्रिकी, खरेदी, फॅब्रिकेशन, फॅब्रिकेशन आणि पॅकेजेसचे कमिशनिंग समाविष्ट आहे. LSTK तत्त्वावर ही योजना १६ महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे,' अशी माहिती कंपनीचे एमडी आणि सीईओ आशिष भंडारी यांनी दिली.
5 / 6
थरमॅक्स लिमिटेडच्या शेअर्सनं या वर्षी आतापर्यंत YTD मध्ये 25.82 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 17 टक्क्यांनी वाढले आहेत आणि गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये १३.८४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या शेअरनं आतापर्यंत ७ हजार टक्क्यांपेक्षा अधिकचा रिटर्न दिलाय.
6 / 6
थरमॅक्स लिमिटेड ही एक मल्टीनॅशनल इंजिनिअरिंग कंपनी आहे. ही कंपनी पुण्याची आहे. थरमॅक्सच्या व्यवसाय पोर्टफोलिओमध्ये हिटिंग, कूलिंग, पाणी आणि कचरा व्यवस्थापन आणि विशेष रसायने उत्पादने समाविष्ट आहेत.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकPuneपुणे