PNB च्या खातेधारकांसाठी मोठी बातमी! उद्यापासून 'या' एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत... By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 6:12 PM1 / 10नवी दिल्ली : देशातील वाढती एटीएम फसवणूक रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) एक मोठे पाऊल उचलले आहे. जर तुमचेही पंजाब नॅशनल बँकेमध्ये अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. 2 / 10उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँकेने ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम (Non-EMV ATM) मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत. 3 / 10म्हणजेच, ग्राहक नॉन-ईव्हीएम मशीनमधून पैसे काढू शकणार नाही. गेल्या काही दिवासांपूर्वी पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.4 / 10'आपल्या ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी 1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँक नॉन- ईएमव्ही एटीएम मशीनमधील ट्रांजक्शनवर (financial & non-financial) प्रतिबंधित करेल. गो-डिजिटल, गो-सेफ ...!' असे ट्विट पंजाब नॅशनल बँकेने ट्विट केले होते. 5 / 10वाढत्या फसवणूकीच्या घटना लक्षात घेता पंजाब नॅशनल बँकेने हे पाऊल उचलले आहे. जेणेकरुन ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील. 1 फेब्रुवारीपासून ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएममधून फायन्सशियल किंवा नॉन-फायन्सशियल व्यवहार करू शकणार नाहीत.6 / 10नॉन-ईएमव्ही एटीएम असे आहे की, ज्यामध्ये ट्रांजक्शनच्यावेळी कार्ड ठेवले जात नाही. यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रिपच्या माध्यमातून डेटा रीड केला जातो. याशिवाय, ईएमव्ही एटीएममध्ये काही सेकंदांसाठी कार्ड लॉक केले जाते.7 / 10अलीकडेच पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना PNBOne अॅपद्वारे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड चालू / बंद करण्याची सुविधा दिली आहे.8 / 10यानुसार, तुम्ही तुमचे कार्ड वापरल्यास नसाल तर ते बंद करू शकता. यामुळे आपल्या बँक खात्यात ठेवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील.9 / 10दरम्यान, गेल्या डिसेंबर महिन्यात पंजाब नॅशनल बँकेने एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केले होते. ज्यामध्ये ओटीपी आधारित रोख रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली. 10 / 10या सुविधेअंतर्गत, खातेदारांना 10,000 रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठविला जातो. या ओटीपीशिवाय रोख रक्कम काढता येत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications