शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडली, सुरू केलं चष्मा विकायचं काम; आज आहे हजारो कोटींच्या कंपनीचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 8:24 AM

1 / 8
असं म्हणतात की यश मिळवण्यासाठी अनेकदा रिस्क घ्यावी लागते. जोखीम पत्करणारेच इतिहास घडवतात. लेन्सकार्ट कंपनीचे संस्थापक पीयूष बन्सल यांनीही अशीच जोखीम पत्करली आणि आज ते यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. पीयूष बन्सल यांनी व्यवसाय करण्यासाठी मायक्रोसॉफ्टमधील आपली चांगली नोकरी सोडली होती. आज त्यांची कंपनी लेन्सकार्ट चष्मा उत्पादक कंपन्यांमध्ये एक मोठं नाव बनलं आहे.
2 / 8
आज पीयूष बन्सल या व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमवत आहे. शार्क टँक इंडियामध्ये जज म्हणून पीयूष बन्सल यांना सर्वांनी पाहिलं. २०१० मध्ये सुरू झालेल्या या कंपनीची आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. पीयूष बन्सल यांनी आपल्या ध्येय आणि दूरदृष्टीनं कंपनीला इतके यश मिळवून दिले आहे. मात्र, हा प्रवास इतका सोपा नव्हता. त्यांना अनेकवेळा अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचा हा प्रवास कसा होता हे आज आपण पाहू.
3 / 8
२००७ पर्यंत पीयूष हे अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीत चांगल्या पॅकेजची नोकरी करत होते. चांगला पगार असूनही त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. २००७ मध्ये पुन्हा भारतात येऊन आपली स्वप्न पूर्ण करण्याचं त्यांनी ठरवलं.
4 / 8
पीयूष बन्सल यांनी एका वर्षापेक्षा कमी काळ काम केल्यानंतर मायक्रोसॉफ्टमधील नोकरी सोडली. त्यांच्या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय आणि मित्र आश्चर्यचकित झाले, खूप समजावूनही ते तयार झाले नाहीत आणि भारतात परतले.
5 / 8
येथील बाजारपेठ समजून घेण्यासाठी त्यांनी सर्च माय कॅम्पस ही क्लासिफाइड वेबसाइट सुरू केली. येथे विद्यार्थ्यांना पुस्तकं, अर्धवेळ नोकरी आणि अन्य गोष्टी शोधण्यात मदत झाली. पीयूष तीन वर्षे या प्रोजेक्टवर काम करत राहिले. याद्वारे त्यांनी भारतीय ग्राहकांचा कल आणि गरजा समजून घेतल्या.
6 / 8
तीन वर्ष ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्यानंतर, पीयूष बन्सल यांनी अनेक वेबसाइट सुरू केल्या. यापैकी एक आयवेअर होती. उर्वरित तीन कंपन्यांनी तरुणांना टार्गेट करून दागिने, घड्याळं आणि बॅग बनवली. प्रतिसाद पाहून त्यांनी आयवेअरवर लक्ष केंद्रित केलं आणि येथूनच लेन्सकार्टची सुरुवात झाली.
7 / 8
पीयूष बन्सल यांनी आपलं संपूर्ण लक्ष आयवेअरवर केंद्रित करून देशातील लहान-मोठ्या शहरांमध्ये आउटलेट्स उघडण्यास सुरुवात केली, जिथे चष्म्याच्या प्रत्येक श्रेणीसोबत, डोळ्यांची तपासणी करण्याची सुविधाही दिली गेली. तसंच या चष्म्यांची ऑनलाइन बाजारात विक्री सुरू झाली.
8 / 8
पीयूष बन्सल यांची ही अनोखी संकल्पना पाहून त्यांना अनेक गुंतवणूकदारांची साथ मिळाली. हळूहळू त्यांची कंपनी यशाच्या दिशेने वाटचाल करू लागली. २०१९ मध्ये, लेन्सकार्ट १.५ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासह युनिकॉर्न बनली. आज पीयूष बन्सल या कंपनीतून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीbusinessव्यवसाय